नागपूर- दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून नागपुरातही 54 जण परत आल्याची माहिती प्रशासनाच्या हाती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्रीपासूनच नागपूर जिल्हा प्रशासनाने ताबडतोब हालचाली करुन त्या 54 जणांना क्वारंन्टाईन केले आहे.
हेही वाचा- आम्हाला भारतात घेऊन चला, फिलीपाईन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी हाक
या 54 जणांमध्ये 8 जण परदेशी असून इतर 46 जण भारतीय आहेत. या शिवाय इतर देखील जे नागरिक या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या नजर चुकीने कोणी राहीले असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.