ETV Bharat / state

Nana Patole On Ajit Pawar: मुख्यमंत्री व्हावे असे वाटण्यात गैर काहीचं नाही; मात्र...; पटोलेंचा अजित पवारांना टोला - Nana Patole On Ajit Pawar

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चांना उधान आले होते. कालपासून (शुक्रवार) अजित पवार यांच्या मनात मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असल्याची देखील चर्चा सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, सक्रिय राजकारणात असताना मुख्यमंत्री व्हावे असे वाटणे त्यात गैर काहीच नाही; मात्र 145 आमदारांचे संख्याबळ असेल तर अजित पवारांनी निश्चित मुख्यमंत्री व्हावे, असा टोमणा देखील नानांनी लगावला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 22, 2023, 5:16 PM IST

नाना पटोले अजित पवारांविषयी बोलताना

नागपूर: आमच्याकडून अजित पवारांबद्दल कोणतेही वक्तव्य झालेले नाही. आम्हाला विश्वास आहे की, ते महाविकास आघाडी मध्येच राहतील. त्यांच्या मनात काय सुरू आहे, याबद्दल मी काय बोलणार? असे देखील पटोले म्हणाले. राजकीय स्फोट होणार-होणार अशी चर्चा सुरू आहे. एकदा लोकशाहीचा स्फोट झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मी राकॉंमध्येच राहणार असे पवार बोलले होते. आता पुन्हा ते जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

मनात खदखद कशाला ठेवायची? पृथ्वीराज चव्हाण यांच्या बद्दल अजित पवारांनी जे म्हटले ते चुकीचे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्याबद्दल आक्षेप होते, तर तेव्हाच सोडून जायला हवे होते. मनात खदखद कशाला ठेवायची? असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी विचारला.

पंतप्रधान उत्तर का देत नाहीत: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा धक्कादायक आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाही? देश विचारत आहे की, 'मोदीजी जवाब दो'. खरं पाहिले तर पंतप्रधान म्हणून मोदींनी उत्तर द्यायला हवे; मात्र ते उत्तर देण्याऐवजी मलिक यांची चौकशी करत आहे.

'ईव्हीएम'वर प्रेम का? अनेक देशात 'ईव्हीएम' सोडून 'बॅलेट पेपर'वर मतदान घेतले जात आहे. निवडणूक आयोग आणि मोदी सरकार 'ईव्हीएम' वरच का अडून बसले आहे. जितेंद्र आव्हाड यांना 'ईव्हीएम'बद्दल शंका वाटत असेल. तरी जनता आता 'ईव्हीएम'च्या माध्यमातून यांना पराभूत करणार आहे असा टोला देखील नाना पटोले यांनी लावला आहे.

पटोलेंचा भाजपवर प्रहार: महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार केंद्र बिंदू ठरले आहेत. दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. तर दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये असा सल्ला ही नाना पटोले यांनी भाजपला दिला. तर अजित पवार भाजप सोबत जाणार की नाही या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसून अजित पवार महाविकास आघाडीत राहणार असल्याचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.

काँग्रेसला 'ती' सवय नाही: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले हे मला माहित नाही. दुसऱ्याच्या घरात झाकून पहायची सवय काँग्रेसला नाही. आज शेतकरी हवालदिल झाला आहे. बेरोजगारमुळे लोक हैराण आहेत. या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणणे काँग्रेसचा धर्म आहे. सत्तेसाठी काहीपण, सत्ता पिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे. या विरोधात काँग्रेस आहे. एकमेकांची घरफोडण्याचे काम भाजपने सुरू केले आहे, ते त्यांनी करू नये असा सल्ला ही नाना पाटोले यांनी दिला आहे.

हेही वाचा: Thane Crime : डॉक्टरचे पैशासाठी फिल्मी स्टाईलने अपहरण; पाच महिन्यांनी पडल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.