नागपूर Nana Patole On Mungantiwar : नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे पप्पू आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सुधीर मुनगंटीवार राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही.
मुनगंटीवारांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या : सुधीर मुनगंटीवारांच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला उत्तर देण्याची गरज नाही असं नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेस पक्ष हा लोकांच्या मनात आहे. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षचं एकमेव पर्याय शिल्लक राहिलाय, अशा भावना लोकांच्या आहेत. जे चित्र महाराष्ट्रात स्पष्ट दिसत आहे. त्यावरून राज्यात पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ज्यांच्या सीट्स जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असं देखील ते म्हणाले आहेत.
ग्लोबल हंगर इंडेक्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला खोटं सांगतात की, भारतात सर्वकाही मजेत सुरू आहे. मात्र, परिस्थिती तशी नाही. पंतप्रधानांनी हजारो कोटी रुपयांचं विमान घेतलं, गाड्या घेतल्या; परंतु त्याने गरीब लोकांचं पोट भरत नाही. गरिबी ही जात आहे, असं पंतप्रधान म्हणत असतील तर भाजपाला गरिबांना मारायचं आहे. देशात भूकबळी वाढत आहेत. कृत्रिम महागाई वाढवली आहे. महागाई कमी केल्यास भूकबळी कमी होतील असं ते म्हणाले आहेत.
भाजपाविरोधात लोकांच्या मनात राग : राहुल गांधी यांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यावरून प्रत्येक समाजाला आर्थिक व शैक्षणिकदृष्टीनं मजबूत करण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी घेतला आहे. मध्यप्रदेशात बहुमताचा अपमान करण्यात आला होता. त्याचा राग लोकांच्या मनात आहे. पाचही राज्यात भाजपाचे पानिपत होईल. या सरकारने प्रत्येक स्थरावर लोकांना त्रास दिला आहे. पाचही राज्यात हीच परिस्थिती आहे. भाजपाच्या नितीला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे, असे नाना पटोले यांनी संकेत दिले आहेत.
हेही वाचा :
- Sharad Pawar News: रिक्त जागांबाबत कायमस्वरुपी भरती करावी, कंत्राटी भरतीवरून शरद पवारांचा सरकारला सल्ला
- Sambhaji Raje On Prakash Ambedkar: औंरगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिलेली शिवप्रेमीला आवडणारं नाही; 'वंचित'शी युती होणं अशक्य, संभाजीराजे स्पष्टचं बोलले
- Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत