ETV Bharat / state

Nagpur Rape Case : कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण; स्केचमुळं अखेर आरोपी अटकेत - बलात्काराच्या आरोपीला नागपुरात अटक

Nagpur Rape Case : कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा धाक दाखवून एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचे प्रकरण नागपुरातील वर्धा रोडवरील जामठा परिसरात घडले होते. (College student rape case) या प्रकरणातील अज्ञात आरोपीचे स्केच पोलिसांनी (student assaulted by threatening to kill) जारी करून त्याविषयी माहिती देणाऱ्यास 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर या आरोपीला 12 दिवसांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Rape Accused Arrested From Nagpur
स्केचमुळे 12 दिवसांनी झाली अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:24 PM IST

Updated : Oct 16, 2023, 10:33 PM IST

बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्याबद्दल माहिती देताना पोलीस आयुक्त

नागपूर : Nagpur Rape Case : कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा धाक दाखवून एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील (Nagpur Collage Student Rape case) आरोपीला शोधण्यात अखेर तब्बल १२ दिवसांनी नागपूर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक जरी केली असली तरी त्याचे नाव, गाव आणि इतर माहिती जाहीर करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आरोपीची माहिती उघड केली जाईल, असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले आहेत.

500 पोलीस घेत होते आरोपीचा शोध : महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवत जंगल परिसरात अत्याचार करण्यात आला होता. घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली होती. आरोपी हा अज्ञात असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस ठाण्याचे एकूण १७ पथकं नेमण्यात आले होते. त्याचबरोबर ५०० पोलीस कर्मचारी देखील आरोपीला शोधत होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे एक स्केच प्रसिद्ध केले होते, त्यावरून अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. संपूर्ण प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने या विषयी सध्या अधिकची माहिती देता येणार नसल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी जाहीर केलं होतं 5 लाखांचं बक्षीस : नागपूर पोलिसांनी आरोपीचे स्केच जारी करताना आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. एवढचं नाही तर महाविद्यालयाच्या जवळ ज्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली होती, तो परिसर झाडी-झुडुपांनी वेढलेला आहे. पुढे जंगलाचा भाग असल्यामुळे आरोपी नेमका कोणत्या मार्गाने पळून गेला आहे, याचा अंदाज यावा म्हणून पोलिसांनी दिवसा आणि रात्री ड्रोनचा वापर करून संपूर्ण परिसराचं मॅपिंग देखील केलं होतं.

एकूणच घटनाक्रम असा आहे : वर्धा येथे राहणारी तरुणी ४ ऑक्टोबर रोजी गावावरून जामठा परिसरात उतरली. जामठा परिसरातील महाविद्यालयात शिकत असल्याने ती बॅग घेऊन महाविद्यालय परिसरात असलेल्या होस्टेलमध्ये जात होती. रस्ता हा जंगली भाग असल्याने एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ तो तिच्या मागावर होता. आरोपीने त्याच्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीचा धाक दाखवत तरुणीला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तरुणीला कुऱ्हाडीने जखमी केले नसले तरी झटापटीत तरुणीच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. मात्र, आता तिची तब्येत सुधारत आहे. या आरोपीला सोमवारी (16 ऑक्टोबर) अटक केली आहे.

हेही वाचा:

  1. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती
  3. Thane Rape Case : धक्कादायक! क्लिनिक बंद करून २५ वर्षीय गतिमंद तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार

Last Updated : Oct 16, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.