नागपूर Nagpur Rainfall: शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने (Water flooded in low lying areas) जनजीवन विस्कळीत झाले. (rescue of 400 citizens in Nagpur) त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील (animals burnt due to rain) प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. (rescue operation started in Nagpur)
![Nagpur Rainfall](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-09-2023/mh-ngp-04-heavy-rain-fall-two-woman-death-7204462_23092023163259_2309f_1695466979_912.jpg)
घरांमध्ये शिरले पाणी : शनिवारी रात्री २ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. सतत दोन तास विजांच्या कडकडाटासह ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाणी ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.
![Nagpur Rainfall](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-09-2023/mh-ngp-04-heavy-rain-fall-two-woman-death-7204462_23092023163259_2309f_1695466979_162.jpg)
लष्करी दलाकडून मदतकार्य : शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि सैन्याचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरू झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूरसह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मूक व कर्णबधीर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.
![Nagpur Rainfall](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-09-2023/mh-ngp-04-heavy-rain-fall-two-woman-death-7204462_23092023163259_2309f_1695466979_1013.jpg)
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट : घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण हाती घेतले.
बावनकुळेंनी घेतला परिस्थितीचा आढावा : आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वॉर रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घतला. त्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत पूर परिस्थिती जाणून घेतली.
१४ जनावरे दगावली : मुसळधार पावसामुळे हजारीपहाड (सह्याद्री) भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
हेही वाचा: