ETV Bharat / state

Nagpur University News : खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूं होणार स्मार्ट ; 'हा' उपक्रम राबवणारे नागपूर देशातील पहिले विद्यापीठ - Make in India project

नागपूर विद्यापीठाने एक खास उपक्रम हाती घेतला आहे. ज्याच्या माध्यमातून खेळाडूंना फायदा होणार आहे. हे विद्यापीठ लवकरच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी स्मार्ट टिशर्ट (Smart T-shirt initiative) देण्यात येणार आहे. ज्यामुळे खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

Smart T-shirt
Smart T-shirt
author img

By

Published : Feb 10, 2022, 10:50 AM IST

नागपूर - खेलो इंडियाच्या माध्यमातून ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंना (Preparing for Olympics through Khelo India) तयार केले जात आहे. पण या खेळाडूंना ऑलिम्पिक दर्जाची तयारी करताना स्मार्ट होण्याची गरज आहे. याचाच भाग म्हणून लवकरच खेळाडूंचे प्रशिक्षण स्मार्ट टीशर्ट पद्धतीने तपासले जाणार आहे. हे टी शर्ट मेक इन इंडियाच्या माध्यमातून वस्त्रउद्योग विभागाच्या साह्याने तयार करण्यात आले आहे. या स्मार्ट टिशर्टची ट्रायल झाली असून पुढील दोन महिन्यात उणिवा दूर करून नागपूर विद्यापीठातील खेळाडूंना मिळणार आहे. भारतात पहिल्यांदा हा प्रयोग नागपूरत विद्यापीठ करणार आहे. पण याचा फायदा काय होणार आहे, चला तर जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून..

विद्यापीठ लवकरच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी स्मार्ट टिशर्ट देणार

काम असो की खेळ त्यातील बारकावे आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होतोच. यातच ऑलिम्पिक आणि इतर जागतिक स्पर्धां डोळ्यासमोर ठेवताना खेळाडूंना सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) हीच गरज ओळखून महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये खेळाडूंसाठी सेन्सरबेस आधारित स्मार्ट टीशर्ट वापरण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात हे उपकरण वापरले जाते. पण भारतात राष्ट्रीय स्तरावर पोहचल्यावर खेळाडूंना उपकरण मिळते. पण कोवळ्या वयात हे उपकरण मिळाल्यास याचा फायदा भविष्यातील उत्तम खेळाडू घडविण्यास होणार आहे.

उणिवा ओळखून दूर करण्यास स्मार्ट टीशर्टचा होऊ शकतो फायदा -

या स्मार्ट टी शर्टच्या माध्यमातून डेटामध्ये खेळाडूंच्या (The advantage of smart t-shirts) शरीरातील तापमान किती, हृदयाच्या ठोक्यांची गती किती, रक्तदाब, ईसीजी, शरीरातील ऊर्जेचे प्रमाण, चालण्याची धावण्याची पद्धत, या प्रत्येक हालचालींची तंत्रशुद्ध माहिती प्रशिक्षकाला रिअल टाइम डेटा म्हणून लॅपटॉपवर बसून पाहता येईल. हे पाहून आणि खेळाडूंच्या उणिवा ओळखून त्या सुधारल्या जातील. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवण्यास आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळण्यास या फायदा होऊ शकतो.

कोणत्या खेळाडूंना मिळणार स्मार्ट टी शर्ट -

नागपूर विद्यापीठात केंद्र सरकारच्या खेलो इंडिया मोहिमे (Khelo India Expedition) अंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि हँडबॉल हे खेळ खेळले जातात. तसेच या खेळांचे विदर्भात कल्चर आणि त्यासाठी शाररिक गुणवत्ता असल्याने खेळाडूंचाही याच खेळावर भर असतो. एकच स्मार्ट टिशर्ट सर्वच खेळासाठी उत्तम ठरणार नाही. त्यामुळे ट्रायलमध्ये काही बदल करण्याचे नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक शरद सूर्यवंशी यांनी स्मार्ट टीशर्ट बनवणाऱ्या कंपनीच्या लक्षात आणून दिले. ते बदल वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी आणि कंपनी एप्रिलच्या सुमारास पूर्ण करून खेळाडूंना या स्मार्ट टीशर्ट मिळणार आहेत. ज्यातून खेळाडूंचा खेळाचा दर्जा नक्की वाढणार आहे.

पहिल्या तीनमध्ये येण्यास स्मार्ट टीशर्ट गेम चेंजर ठरणार -

खरंतर या सगळ्याची गरज म्हणजे भारतात ही जागतिक दर्जाचे चॅम्पियन्स आहेत. भारतातील अनेक खेळाडूं ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय खेळासाठी जातात. पहिल्या दहा मध्ये पोहचण्याची कुवत आपल्या खेळाडूंची आहे. पण पहिल्या एक आणि दोन मध्ये पोहचून मेडल आणायचे असल्यास हे तंत्रशुद्ध बदल करावेच लागणार, असे नागपूर विद्यापीठाचे स्पोर्ट संचालक सूर्यवंशी सांगतात. यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केंद्रीय (By the Union Ministry of Sports) वस्त्रोद्योग विभागाला खेळाडूंसाठी खास स्पोर्ट्स स्मार्ट उपकरण पण स्वस्तात बनवण्यास सांगितले. त्यांनतर वस्त्रोद्योग विभागाने चिप्स लागलेल्या खास स्मार्ट टीशर्ट कमाला टेक या कंपनीच्या साह्याने स्टार्टअपमध्ये केले आहे.

मेक इन इंडियाच्या माध्यमातून खेलो इंडियाला स्वस्तात मस्त स्मार्ट टी शर्ट मिळणार -

स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साईच्या प्रशिक्षण केंद्रात स्मार्ट टी शर्टचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ स्तरावर त्याचा पहिला प्रयोग नागपूर विद्यापीठाने सुरु केला आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर अशा स्मार्ट टीशर्ट्स 50 हजार रुपयांच्या किंमतीत विकत घ्यावे लागतात. मात्र, मेक इन इंडिया प्रोजेक्ट (Make in India project) अंतर्गत वस्रोद्योवग विभागाने तयार केलेली स्मार्ट टीशर्ट अवघ्या 15 हजार रुपयात तयार करण्यात झाली आहे. जवळपास 1 लाख 20 हजाराच्या 8 टीशर्ट प्रत्येकी दोन गोळ्या मागवण्यात आल्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.