ETV Bharat / state

Nagpur Teacher Constituency election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचा प्रचार संपला, सोमवारी खरी परीक्षा - शुभांगी पाटील

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होऊ घातली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारेल याची परीक्षा सोमवारी होणार आहे. सहा जिल्ह्यांत १२४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

vidhan bhavan
नागपूर विधान भवन
author img

By

Published : Jan 29, 2023, 9:43 AM IST

नागपूर : निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. नागपूर विभागात एकूण ३९ हजार ६०४ शिक्षक मतदार असून यात १६ हजार ७०२ महिला तर २२ हजार ७०४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

नागपूर विभागात १२४ मतदान केंद्र : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये १२४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान केंद्राबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून ३१ डिसेंबर २०२२ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात ४३ मतदान केंद्र, वर्धा जिल्ह्यात १४, भंडारा जिल्ह्यात १२, गोंदिया जिल्ह्यात १०, चंद्रपूर जिल्ह्यात २७ तर गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्र आहेत.

नागपूर विभागात ३९ हजार ४०६ मतदार : नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. २०१७ मध्ये नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या ३५ हजार ९ होती तर २०२२ अखेर ही संख्या वाढून ३९ हजार ४०६ झाली आहे. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या : नागपूर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची एकूण संख्या १६ हजार ४८० आहे. यात ९ हजार २५६ महिला तर ७ हजार २२४ पुरुष मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ४ हजार ८९४ असून यात २ हजार ९६२ महिला तर १ हजार ९३२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ७९७ मतदार आहेत. यात १ हजार २२५ महिला तर २ हजार ५७२ पुरुष मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८१ मतदार असून यात १ हजार २१८ महिला तर २ हजार ६६३ पुरुष मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार ५७१ मतदार आहेत. यात २ हजार ६८४ महिला तर ४ हजार ८८७ पुरुष मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार २११ मतदार असून यात ६३० महिला आणि २ हजार ५८१ पुरुष मतदार आहेत.

गडचिरोली सकाळी ७ ते दुपारी ३ मतदान : भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.

नागपूर, नाशिक मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत : राज्यात पाच ठिकाणी, कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षक आणि नाशिक, अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. यांपैकी नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक हे दोनच मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. नाशिक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आणि शिवसेनेचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने, तर नागपूर गंगाधर नाकाडे यांची माघार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार हे नॉट रिचेबल असल्यामुळे आता नागपुरात रिंगणात २२ उमेदवार असणार आहेत.

हेही वाचा : Agra Crime News : अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश, 300 फोटो आणि व्हिडिओ जप्त

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.