ETV Bharat / state

Nagpur Crime News: 'त्या' हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक; सेक्सटोर्शन केसमध्ये सक्रिय सहभाग - सेक्सटॉर्शन प्रकरण

नागपुरमध्ये भाजपा महिला पदाधिकाऱ्याचा खून झाल्याची घटना घडलीय. अजून पीडितेचा मृतदेह मिळालेला नाहीय. या प्रकरणात पीडितेच्या पतीनेच सेक्सटॉर्शनमध्ये तिचा हनी ट्रॅप म्हणून वापर केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याचा देखील या सेक्सटॉर्शन प्रकरणात सक्रिय सहभाग आहे.

Nagpur Crime News
आरोपीला अटक
author img

By

Published : Aug 22, 2023, 10:22 AM IST

Updated : Aug 22, 2023, 10:33 AM IST

नागपूर : नागपुरातील भाजपाच्या पदाधिकारी महिलेच्या खून प्रकरणाचा गुंंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. या प्रकरणात पीडितेचा पती आणि त्याचे उर्वरित दोन साथीदार नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या पतीने हत्या केल्याची कबूली दिली. परंतु, तो वारंवार वेगवेगळी उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी या महिलेवर सेक्सटॉर्शनसाठी दबाव आणला होता. आरोपींनी अनेक मोठ्या नेत्यांसह काही व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आता या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या चार झाली आहे.

आरोपीचे नागपूर, जबलपूरात नेटवर्क : या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या 35 वर्षीय महिलेची फेसबुकद्वारे आरोपीसोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेम होऊन त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. पीडितेचा पती व नागपुरमध्ये राहणारे त्याचे साथीदार तिच्यावर दबाव टाकायचे. तिला मानसिक त्रास देऊन तिला ठार मारण्याची धमकीही द्यायचे. त्यानंतर ते त्या महिलेला ओळखीच्या लोकांकडे पाठवून त्यांच्यासोबत अश्लिल व्हिडीओ व फोटो काढण्यास सांगायचे. त्यानंतर अश्लिल व्हिडीओ व फोटोच्या मदतीने आरोपी व त्याचे साथीदार या लोकांना धमकावून ब्लॅकमेल करत होते. त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते.

पतीसोबत भांडण : पीडिता एक ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशच्या जबलपूरला गेली होती. २ ऑगस्टनंतर तिचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पीडितेने पतीच्या व्यवसायात पैसे गुंतवलेले होते. तसेच काही सोन्याचे दागिने देखील भेट दिले होते. पतीनं ते दागिने विकले असल्याचा संशय पीडितेला होता. यावरून त्या दोघांचं मोठं भांडण झालं होतं. रागाच्या भरात पतीनं लोखंडी रॉड डोक्यावरून मारून पत्नीची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime News: सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये पतीकडूनच 'हनी ट्रॅप' म्हणून वापर, अनेकांना ब्लॅकमेल करत कोट्यवधी रुपये उकळले!
  2. Nagpur Girl Rape Case : औषध लावण्याच्या बहाण्याने युवतीवर 63 वर्षीय नराधमाचा अत्याचार; 'असं' फुटलं बिंग
  3. Raid On Hotel Cityscape: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॉटेल सिटीस्केपवर पोलिसांचा छापा

Last Updated : Aug 22, 2023, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.