ETV Bharat / state

वाढीव गुणांमुळे पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत वाढणार स्पर्धा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. मात्र सर्वच शाखेतील अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाल्याने सध्या विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करताना दिसत आहेत.

final year exam news
नागपूर विद्यापीठ
author img

By

Published : Nov 27, 2020, 3:04 PM IST

नागपूर - कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर आता निकालाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळजवळ सर्वच विद्यार्थी अपेक्षेपेक्षा अधिक गुणाने उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठात आता पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मोठी चुरस निर्माण होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. मात्र सर्वच शाखेतील अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाल्याने सध्या विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करताना दिसत आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठांना निकाल जाहीर करतानाही मोठी मदत मिळाली. मात्र या प्रक्रियेचा विद्यार्थांना मोठा फायदा झाला आहे. सर्वच शाखेतील बहुतांश विद्यार्थांना अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळाल्याने सध्या विद्यार्थांकडून पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. शिवाय या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आत्तापासून कागदपत्रांची जमवाजमव करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून विद्यार्थांना मिळालेले अधिक गुण या प्रक्रियेसाठी मोठी स्पर्धा निर्माण करणारे ठरत आहे. या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत एमए., एमएससी., एलएलएम., एम. कॉम. या सारख्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षीची पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया विद्यार्थांसाठी मोठी आव्हानात्मक ठरणार आहे. अंतिम वर्षाच्या निकालात जवळजवळ सर्वच विद्यार्थांना ८० ते ९० टक्के इतके प्रत्येकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थांमधे प्रचंड उत्साह दिसून येत आहे. असे असले तरी सगळ्याच विद्यार्थांना अधिकचे गुण असल्याने आपला प्रवेश यशस्वी करण्यासाठी मोठी कसरत देखील करावी लागणार आहे. तर दुसरीकडे बीए, बीएससी या अभ्यासक्रमाचे निकाल येणे अजून बाकी आहे. त्यामुळे त्यातील उत्तीर्ण विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी असणार आहे. अशावेळी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होणे सर्वच विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनाला सुरूवात करण्यात येत आहे.

हेही वाचा - मेधा पाटकराचं शेतकऱ्यांसह ग्वाल्हेर महामार्गावर आंदोलन; दिल्लीकडे जाताना पोलिसांनी रोखले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.