नागपूर - शहराला वीजपुरवठा करणारी एसएनडीएल कंपनी आर्थिक डबघाईस आल्यामुळे त्यांनी वीजपुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या कंपनीची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या अनुषंगाने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज (रविवारी) मध्यरात्री पासून शहराला महावितरणमार्फत वीजपुरवठा वितरण व्यवस्था ताब्यात घेत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हेही वाचा - पुर्णामध्ये सापडल्या डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या, 'एटीएस' ने एकाला केली अटक
या आधी एसएनडीएल तर्फे संपूर्ण शहराला वीजपुरवठा केला जात होता. मात्र, एसएनडीएल विरोधात ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या.
हेही वाचा - गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे सोलापुरात भीक मांगो आंदोलन
आधी २४ तास वीज असूनही शहरात ट्रीपिंगची समस्या कायम होती. फीडरवर नियंत्रण नव्हते. शासनामार्फत त्यांना २-३ वेळी नोटीस देण्यात आल्या. याचबरोबर ५८ कोटींचे एकात्मिक विकास (integrated development) साठी महावितरणतर्फे सुरू करण्यात आले. मात्र, एवढे प्रयत्न करुनही एसएनडीएल कंपनीने वीजपुरवठा करण्यास असमर्थता दर्शवत महावितरणने हे जाळे आपल्या ताब्यात घ्यावे, असे सांगितले. तसेच आता महावितरणतर्फे वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - इस्रोच्या चांद्रयान मोहिमेवर नासाची प्रतिक्रिया...
याचबरोबर या कंपनीकडे 225 कोटी रुपये थकीत आहेत आणि हेच पैसे महावितरणला द्यायचे आहेत. मात्र, त्यांचे ठेकेदार यांना त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे ३५ कोटी थकबाकी राहिली आहे. तर, जनतेनेकडेही मागील तीन महिन्यांच्या काळातील जवळपास ७० कोटी रुपये थकीत आहेत. आता ही देणी महावितरणच्या अधिपत्याखाली येत असल्याने यासाठी महावितरण ग्राहकांकडून ग्राहकसेवा आणि थकबाकी वसूल करेल. याचबरोबर २४ तास वीज देणे ही शाश्वत विकासाची जबाबदारी राहील, असेही ऊर्जामंत्री यांनी सांगितले.