नागपूर - मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटता सुटत नाहीये. सत्तासंघर्षावर मध्यस्थीच्या सर्व प्रयत्नानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे स्वतः मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डॉ. मोहन भागवत स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
अयोध्या जमीन विवाद प्रकरणाचा निकाल कधीही येऊ शकतो. तत्पूर्वी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्थिर सरकार असणे महत्वाचे आहे. शिवसेना आणि भाजप ही हिंदुत्ववादी विचारांवर चालणारी पक्ष आहेत. देशहितासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच ही सत्ता संघर्षाची कोंडी सोडविण्यासाठी संघ मध्यस्थी करेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.