ETV Bharat / state

Jansavand Yatra : मोदी सरकारने देशाची माती केली - नाना पटोले - जनसंवाद पद यात्रेचे आयोजन

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नऊ वर्षातील कुशासनाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी, जनसंवाद पद यात्रेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. ही पदयात्रा प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

jansavand yatra
जनसंवाद पदयात्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 6:44 PM IST

Updated : Aug 22, 2023, 6:58 PM IST

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

नागपूर : काँग्रेस पक्षाकडून ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढणार असल्याची घोषणा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जनसंवाद पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सर्व गटाचे आमदार व कार्यकर्ते एकत्रित आले होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदींसह पूर्व विदर्भातील आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी सरकारवर गंभीर आरोप : गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशाची माती केली आहे. संविधानिक व्यवस्थेला संपवले जात आहे. बेरोजगारांचा देश बनवला जात असून, शेतकऱ्यांनाही आत्महत्या करायला प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला आहे. कृत्रिम पध्दतीने महागाई वाढवली जात आहे. मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. थोर नेत्यांचा रोज अपमान करण्याचे पाप हे सरकार करते आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात ३ सप्टेंबरपासून काँग्रेसपक्षाकडून जनसंवाद यात्रा काढली जाणार. गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशाची माती केली आहे. संविधानिक व्यवस्थेला संपवले जात आहे. बेरोजगारांचा देश बनवला जात असून, शेतकऱ्यांनाही आत्महत्या करायला प्रवृत्त केले. मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. थोर नेत्यांचा रोज अपमान करण्याचे पाप हे सरकार करत आहे. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सरकार विरुद्ध लोकांच्या मनात चीड : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. काँग्रेस देशाच्या संविधानिक व्यवस्थेला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्यापाठीशी उभे राहण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या केंद्र सरकारच्या योजना कशा बोगस आहेत आणि जनतेला कसे लुटून व्यापारी लोकांना मोठे केले, हे जनतेला सांगण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले आहेत.

मंत्र्यांचा भ्रष्टाचार पुढे आणणार : नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथे सांगितले की, मै व्यापारी हूं आणि व्यापारी कसा जनतेला लुटतो याचा प्रत्यय जनतेला येत आहे. डिझेल पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो. वेगवेगळ्या मार्गाने लाखो रुपये जमा केले जात आहेत. अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटीमध्ये कसा तयार केला जातो हे कॅगच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहेत. त्यांचे सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहेत हे आम्ही दाखवून देणार आहोत.

महाराष्ट्रात येड्याचे सरकार : महागाई कृत्रिम वाढवली जात आहे. शेतकऱ्यांना फसवले जात आहे. या सगळ्या गोष्टीची पोलखोल करणार आहे. महाराष्ट्रात येड्याचे सरकार आहे. त्याची पोलखोल करून जनतेच्या मनात भाजपाविरोधात जो राग आहे तो राग सत्ता उलथवून लावेल. आता त्यांच्याजवळ कोणताही चेहरा बाकी राहिलेला नाही. भाजपाकडचे सगळे चेहरे संपले आहेत. भाजपाचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.

हेही वाचा -

  1. INDIA Meeting in Mumbai: 'इंडिया'च्या बैठकीत महाविकास आघाडीत 'अशी' असणार जबाबदारीची विभागणी
  2. Nana Patole on VBA : महाविकास आघाडीत सहभागासाठी 'वंचित'चा प्रस्ताव? नाना पटोले म्हणाले...
  3. Bharat Jodo Yatra 2 : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच... राज्यातील सहा भागातून होणार पदयात्रा

Last Updated : Aug 22, 2023, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.