ETV Bharat / state

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने काय केले ?

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांचा खात्यात जमा होईल. मात्र, राज्याला मदतीचा निधी कमी पडत आहे. अशावेळी केंद्राला वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. याचा अर्थ केंद्राच्या मनात काळ बेरे असल्याची टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली .

central goverment over aid for rain affected
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाने काय केले ?
author img

By

Published : Nov 6, 2020, 6:04 PM IST

Updated : Nov 6, 2020, 7:23 PM IST

नागपूर- अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदतही जाहीर केली आहे. शिवाय येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहोचणार आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने किती मदत दिली? असा सवाल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आज नागपुरात पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी केंद्र सरकारला सवाल केला. विरोधीपक्ष फक्त राज्य शासनावर टीका करायचे म्हणून टीका करत असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी यावेळी केला.

राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. शिवाय राज्याला मदतीचा निधी कमी पडत आहे. अशावेळी केंद्राला वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. याचा अर्थ केंद्राच्या मनात काळ बेरे असल्याची टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य शासन म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळीच मदत पोहोचण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मात्र विरोधी पक्षाचा केवळ टीका करण्याचा हेतू असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने काय केले ?

पथकाचा पत्ताच नाही-

शिवाय अशा नैसर्गिक संकटात केंद्राची वाट न पाहता मोठी मदत महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली आहे. यात जवळ जवळ ४१ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. ज्यात विदर्भाचाही समावेश आहे. शिवाय या मदतीची कोणीही श्रेय घेऊ नये, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सोबतच केंद्राकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवा, अशी मागणी पत्राव्दारे केली आहे. मात्र आज २०-२५ दिवस होऊनही त्या पथकाचा पत्ता नाही. त्यामुळे यावर विरोधकांनी काय गोडबंगाल केलं आहे हे स्पष्ट करावे. असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

दोन टप्प्यात मिळणार मदत-

नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांनाही मदत दोन टप्प्यात मिळणार आहे. ज्यात रस्ते, घर, शेती या सगळ्याचाच समावेश असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ही मदत येत्या दोन तीन दिवसात शेतकऱ्यांपर्यत पोहचावी यासाठी सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे. असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सोबतच या बाबतचे पत्र निवडणूक आयोगालाही पाठवण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांना ही मदत लवकर मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आग्रही असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Last Updated : Nov 6, 2020, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.