ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; पोस्टरला काळे फासत नोंदवला निषेध - Nitin Gadkari Reaction on Uddhav Thackeray

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक असल्याची ठाकरे यांनी जहरी टीका व घणाघात त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Political Crisis
उद्धव ठाकरेंवर टीका
author img

By

Published : Jul 11, 2023, 9:47 AM IST

Updated : Jul 11, 2023, 9:53 AM IST

नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपूरमधील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना सडकून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याचे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत, उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.

  • उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते मा. @Dev_Fadnavis यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य…

    — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटच्या माध्यमातून सवाल : भाजपाचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सवाल विचारला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो, काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात, हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटींची वसुली केली. महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असे ट्विट बावनकुळे यांनी केले आहे.

  • श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप…

    — Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उद्धव ठाकरेंच्या फोटोचा बॅनर फाडला : भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवसेनेकडून लावण्यात आलेले उद्धव ठाकरेंच्या फोटोचा बॅनर फाडत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टरला काळे फासत निषेध नोंदवला आहे. नागपुरचा चेहरामोहरा बदलून नागपुरचा विकास करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांना नागपुरचा कलंक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आज झाशी राणी चौकात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. तिथू संपुर्ण युवा मोर्चासोबत व्हेरायटी चौकात जाऊन निषेध आंदोलनात सहभागी होणार आहे.

हेही वाचा :

  1. Uddhav Thackeray : 'देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक', उद्धव ठाकरेंची जहरी टीका
  2. Maharashtra Political Crisis: खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव, बावनकुळे यांची टीका
  3. Uddhav Thackeray : 'राम मंदिर भाजपमुळे बनले नाही, तर..' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Last Updated : Jul 11, 2023, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.