ETV Bharat / state

Nana Patole on Barsu Refinery : जनतेच्या भावना चिरडून टाकण्याचे पाप सरकार करत आहेत - नाना पटोले - BARSU REFINERY

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही. हम करे सो कायदा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बारसू येथे रिफायनरी विरोधात संघर्ष तीव्र झाल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस नाही. म्हणून मी बरसूला भेट दिली होती. त्यावेळी हजारो नागरिकांनी प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.

NANA PATOLE ON BARSU REFINERY
नाना पटोले
author img

By

Published : Apr 25, 2023, 2:03 PM IST

Updated : Apr 25, 2023, 2:17 PM IST

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही. हम करे सो कायदा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बारसू येथे रिफायनरी विरोधात संघर्ष तीव्र झाल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

नागपूर : प्रकल्प कुठे झाला पाहिजे याचे काही संकेत आहेत. कोकणमध्ये हा प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारा ठरेल, परंतु सरकारच्या लोकांनी याभागात मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. त्यांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. प्रकल्पाच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकाराचा खून करण्यात आला होता. जनतेच्या भावना चिरडून टाकण्याचे पाप सरकार करत आहेत का? हे बिल्डर आणि उद्योगपतींचे सरकार आहे असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. सरकारने मध्यस्ती केली पाहिजे. हे सरकार असे का वागते आहे, हा प्रश्न आहे. प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस नाही, स्थानिकांना त्रास होऊ नये, यांच्या बगबच्च्यांनी जमिनी घेतल्या आहेत. म्हणून प्रकल्प तिथेच झाला पाहिजे असा आग्रह असेल तर तो चुकीचा आहे, असे नाना म्हणाले.

मधला मार्ग काढला पाहिजे : तिथे पुरुषांपेक्षा महिलांचा आग्रह जास्त आहे. पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न करत असेल तर जालियनवाला सारखे सरकार वागत आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. पर्यावरणही तेवढेच महत्वाचे आहे, मधला मार्ग काढायला पाहिजे. मी स्वतः त्या जागी गेलो होतो, तेव्हा दोघांचेही मत ऐकले, सरकारला सांगितले, पण सरकार प्रकल्पापेक्षाही त्यांच्या मित्रांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात अनेक प्रश्न महत्वाचे : मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. भाजपसोबत जमत नसल्याने सीएम सुट्टीवर गेल्याचा आरोप केला असताना नाना पटोले यांनी राज्यात कोण सीएम आहे, कोण राहणार याबाबत काँग्रेसला काही देणे-घेणे नसल्याचे म्हटले आहे. यापेक्षा महागाई, रोजगार, जनतेचे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत.

हिंदू संप्रदाय लोकांना उन्हाने मारून टाकले : खारघरमध्ये घटना झाल्यावर काही मंत्री विदेशात गेले, एक सदस्यीय समिती बनवली. कोणताही धार्मिक संप्रदाय सुरक्षित नाही. हिंदू संप्रदाय लोकांना उन्हान मारून टाकले. जनतेला न्याय मिळवून देणे काँग्रेसचे म्हणणे आहे. पवार-अदानी संबंधावर बोलणार नाही : जो भाजपच्या विरोधात लढायला तयार असेल त्याला सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आता पवार परिवाराचे शेयर्स कुठे कुठे आहे हे बघायला मी जासुस नाही. कोणाचे कुणाशी व्यक्तिगत काय संबंध आहेत यावर आम्ही काही बोलणार नाही.

हेही वाचा : गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने भीमा पाटस कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयकडे तक्रार- संजय राऊत यांचा दावा

Last Updated : Apr 25, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.