नागपूर - नाल्यावर असलेल्या लोखंडी खांबावरुन नाला पार करताना गेल्याने एक दहा वर्षीय चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर नगर परिसरात घडली. निहाल मेश्राम असे या वाहून गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याचा शोध घेणे सुरू आहे.
शहरात दिवसभर दमदार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. अशातच गुलमोहर नगरातील नाला पूर्ण भरून वाहत लागला. निहाल नाल्यावर असलेल्या लोखंडी खांबावरून नाला पार करण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात कोसळला. नाल्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहत गेला. सुरुवातीला स्थानिकांनी निहालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागू शकला नाही.
हेही वाचा - राज्याच्या मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर अधिक; शरद पवारांची माहिती..
घटनेची माहिती कळताच, कळमना पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी बोटच्या मदतीने निहालचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागू शकला नाही.