ETV Bharat / state

महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ४ महिला ताब्यात - महिला

सध्या आयपीएल सुरू असल्याने जरीपटका भागात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दयानंद पार्क परिसरातील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या महिलांचा जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ४ जुगारी महिलांना ताब्यात घेतले आहे.

महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
author img

By

Published : May 9, 2019, 3:33 PM IST

नागपूर - शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयानंद पार्क परिसरातील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ४ जुगारी महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांची धाड पडताच दोन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत.

महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जरीपटका पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून परिसरातील जुगार अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. सध्या आयपीएल सुरू असल्याने जरीपटका भागात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. जुगारी आणि सट्टेबाजावर फास आवळत असताना पोलिसांना दयानंद पार्क परिसरातील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या महिलांचा जुगार अड्ड्या सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदराकडून मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी माहितीची शहानिशा करून त्या जुगार अड्ड्यावरही धाड टाकली.

या कारवाईची कुणकुण लागताच २ महिला खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. तर ४ महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजारांची रोख जप्त केली आहे. नागपुरात यापूर्वी महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा पडल्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Intro:नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दयानंद पार्क परिसरातील एका पॉश इमारतीत येथे सुरु असलेल्या महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ४ महिलांना ताब्यात घेतले आहे....पोलिसांची धाड पडताच दोन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत.... पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजारांची रोख जप्त केली आहे Body:जरीपटका पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून परिसरातील जुगार अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.....सध्या आयपीएल सुरु असल्याने जरीपटका भागात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याने जरीपटका पोलीसांनी त्या दृष्टिकोनातून देखील धरपकड सुरु केली आहे..... जुगारी आणि सटोरिंवर फास आवळत असताना पोलिसांना गुप्त बातमीदराकडून माहिती समजली होती कि दयानंद पार्क परिसरातील एका पॉश इमारतीत येथे सुरु असलेल्या महिलांचा जुगार अड्ड्या भरवला जातोय.... पोलिसांनी माहितीची शहानिशा करून त्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे .... पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच २ महिला खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत.... पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.... पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजारांची रोख जप्त केली आहे.... नागपुरात या पूर्वी महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड पडल्याची हि पहिलीच घटना असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.