ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिम्बॉयसिस विद्यापीठचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

author img

By

Published : Jul 28, 2019, 5:03 PM IST

नागपूर हे एज्युकेशन हब व्हावे ही इच्छा होती. त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आंतराष्ट्रीय दर्जाच्या सिम्बॉयसिस विद्यापीठचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर - सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर हे एज्युकेशन हब व्हावे ही इच्छा होती. त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर शहराच्या वाठोडा परिसरातील ७५ एकर जागेवर शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. ७५ एकर जागेवर १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सिम्बॉयसिस ऑफ लॉ स्कुल आणि सिम्बॉयसिस स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड डिझाइन हे ३ शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठात २५ टक्के जागा या नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सूट देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १ रुपये दराने महापालिकेने ३० वर्षाकरिता ही जागा सिम्बॉयसिसला दिली आहे. त्याच्या बदल्यात २५ टक्का जागा नागपूरकरांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सूट देण्याचा करार झाला आहे. वाठोडा परिसरातच १२० एकर जागेवर जागतिक स्तराचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करणार असल्याची घोषणा यावेळी गडकरी यांनी केली.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्यांवर जोर दिला. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी चांगले संस्था आहेत तिथे प्रगती होते. मानवी संसाधन निर्माण करणे विकासाचे लक्षण आहे. देशातील सर्व प्रतिष्ठित संस्था नागपुरात आले आहेत. नागपूरला शैक्षणिक हब म्हणून विकसित करताना एव्हीएशन हब म्हणून देखील विकसित करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

Intro:सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यपीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले....यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते....
नागपूर हे एज्युकेशन हब व्हावं ही इच्छा हाती,त्या दिशेने पाहिले पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे
Body:नागपूर शहराच्या वाठोडा परिसरातील 75 एकर जागेवर शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे....75 एकर जागेवर 10 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे....या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सिम्बॉयसिस ऑफ लॉ स्कुल,आणि सिम्बॉयसिस स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड डिझाइन या तीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत....सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यपीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले....या विद्यापीठ मध्ये 25 टक्के सीट्स ह्या नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सूट देण्यात आली आहे...यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की 1 रुपये दराने महापालिकेने 30 वर्षाकरिता ही जागा सिम्बॉयशीसला दिली आहे ,त्याच्या बदल्यात 25 टक्का जागा नागपूरकरांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सूट देण्याचा करार झालेला आहे ...वाठोडा परिसरातच 120 एकर जागेवर जागतिक स्तराचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली...त्यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्यांवर जोर दिला,ते म्हणाले आहेत की ज्या ठिकाणी चांगले इन्स्टिट्यूटशन आहे तिथे प्रगती होते,ह्यूमन रिसॉर निर्माण करणे विकासाचे लक्षण आहे... देशातील सर्व प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ह्या नागपुरात आले आहेत नागपूरला शैक्षणिक हब म्हणून विकसित करताना एव्हीएशन हब म्हणून देखील विकसित करायचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.