ETV Bharat / state

'भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता' - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना 'तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे वचन बाळासाहेबांना दिले होते का?' असा खोचक सवाल केला होता. त्यावर आज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले, "काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असे वचन मी बाळासाहेबांना दिले नव्हते. पण, मी असे म्हणालो होतो की, भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपचे ओझे वाहत होतो, ते आता खांद्यावरून उतरवले आहे”

ut
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
author img

By

Published : Dec 19, 2019, 3:39 PM IST

नागपूर - भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना 'तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे वचन बाळासाहेबांना दिले होते का?' असा खोचक सवाल केला होता. त्यावर आज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले, "काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असे वचन मी बाळासाहेबांना दिले नव्हते. पण, मी असे म्हणालो होतो की, भाजपची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपचे ओझे वाहत होतो, ते आता खांद्यावरून उतरवले आहे”

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आणि विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले'

बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाचे कौतुक तुम्हाला कधीपासून होऊ लागले, असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी विरोधी पक्षाला केला. आपण बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ, असेही ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

Intro:Body:mh_mum_asembly_gov_cm_repy2_day4_nagpur_7204684

होय..भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिला होता: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नागपूर : होय भाजपाचं ओझं वाहत होतो. ते आता खांद्यावरून उतरवलं आहे.भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिला होता असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आज विधानसभेत सांगितलं.
हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढवत जोरदार समाचार घेतला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर भूतकाळातील घटनांचे दाखले देत टीका केली होती. फडणवीस यांच्या भाषणाला उद्धव ठाकरे यांनी भारूड, अभंगाचे दाखले देत प्रत्युत्तर दिले.

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीपासून आक्रमक असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अधिभाषणावर बोलताना सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी प्रथमच मराठीत भाषण केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भाषण कमी असले तरी हे कृतीचे भाषण आहे. हे गोरगरींबाचे सरकार आहे. या गरीबांना बुलेट ट्रेन पडवडणार नाही. पण रिक्षा मात्र परवडेल असा प्रतिटोला त्यांनी लगावला.

ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या पाठिंब्यानं करणार, असं वचन बाळासाहेबांना दिला होतं का? मी त्यांना सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असं म्हणालो नव्हतो. पण, दिलेल्या शब्दाच कौतूक तुम्हाला कधीपासून होऊ लागलं आहे. मी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल आणि बाळासाहेबांचं वचन पूर्ण करेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो, यापूढेही पाळणार. विशेष म्हणजे मी असंही म्हणालो होतो की, भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपाचं ओझं वाहत होतो. ते खांद्यावरून उतरवलं आहे,” असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.

महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना विरोधी पक्षनेते यांनी भारूडाचा आधार घेतला होता. फडणवीस यांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत तुकडोजी महाराज यांचा अंभग वाचून दाखवत उत्तर दिलं. “धर्म आणि राजकारण एकत्र करू नका. सरकार चालवताना किमान समान कार्यक्रम आहे. हे आमचं सरकार आहे. त्यामुळे मी असं म्हणेल, पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे: शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या!,” असं ठाकरे म्हणाले.

सामनाच्या उल्लेखाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “चहापेक्षा किटली गरम होऊ शकते. पण, किटली पुसलेलं फडकही गरम होऊ लागलं आहे. याचं आश्चर्य वाटत आहे. सोयीचं तेव्हढं वाचायचं आणि बोलायचं. पंतप्रधान मोदी बारामतीमध्ये येऊन म्हणाले होते, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारण शिकलो. असं ते म्हणत असतील तर मग तुमचं तुमच्या नेत्याबरोबर पटत नाही का? ते ठरवायला हवं,” टोलाही उद्धव यांनी फडणवीस यांना लगावला.
शेतकऱ्यांसाठी मी शब्द दिला आहे. फडणवीस, तुम्ही शब्द पाळला नाही.
मी भाजपची कायमची पालखी वाहणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.