ETV Bharat / state

Husband Killed Wife : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच केली पत्नीची हत्या

नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाणे हद्दीतील त्रिशरण परिसरात एका संशयखोर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 12:28 PM IST

Updated : Aug 28, 2023, 12:41 PM IST

नागपूर : शहरात आणखी एक खून झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. शहरातील वाडी भागातील त्रिशरण परिसरात एका संशयखोर पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

चारित्र्यावरील संशय जीवावर बेतला : हत्येची ही घटना नागपूर शहराच्या वेशीवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी आंबेडकर नगर त्रिशरण चौक परिसरात घडली आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीनेच हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली आहे. हे दोघे पती पत्नी गेल्या ५ वर्षांपासून त्रिशरण चौकातील एका घरात भाड्याने राहात होते. यातील पत्नीचं पहिलं लग्न आधीच एका मुलाशी झालं होतं. मात्र, ते दोघेही परस्पर वादामुळे वेगळे झाले होते. त्यानंतर २०१५ पासून हे दोघेजण एकत्र राहत होते. यातील पती दिवसभर चहाचे दुकान सांभाळत होता. त्यानंतर संध्याकाळी तो बाऊन्सर म्हणून काम करायचा. मात्र या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रोजच वादा-वादी होत होती. यातील पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. खून करण्यापूर्वी देखील याच विषयावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. तेव्हा आरोपीने चाकूने तिच्या पोटात वार केले. ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यासंदर्भात शेजारी राहणाऱ्या लोकांनी ही माहिती लगेच वाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. या दोघांचेही हे दुसरे लग्न असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. पोलीस तपास करत आहेत.

प्रेयसीच्या नवऱ्याला संपवले : यापूर्वीही नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडी दिक्षीत येथे अशीच एक विचित्र खुनाची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला तिचा पती रोजचं मारहाण करत होता. ते यातील पत्नीच्या प्रियकराला कळलं. त्यामुळे त्यानं आपल्या प्रेयसीच्या पतीची हत्या केली. यातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा

  1. Nagpur Murder Case : हत्येचं कोडं सोडवण्यासाठी नागपूर पोलीस घेणार गुगलची मदत, आरोपी करत आहे 'दिशाभूल'
  2. Murder Case : नागपूर महिला हत्या प्रकरण; मध्यप्रदेशातील आमदाराची होणार चौकशी
  3. Jalna Crime : चोर समजून चौघांची तरुणाला बेदम मारहाण, मृत्यूपूर्वीची दयेची विनवणी ठरली व्यर्थ

Last Updated : Aug 28, 2023, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.