ETV Bharat / state

Gold Smuggling News : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून दोन किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, विमानतळावरून दोघांना अटक - सीमाशुल्क नागपूर सोने तस्करी कारवाई

Gold Smuggling News नागपूर विमानतळावर आज पहाटे सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई केलीय. प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून पेस्ट स्वरूपात दोन किलोहून अधिक सोन्याची पेस्ट स्वरुपात तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केलीय.

Gold Smuggling News
Gold Smuggling News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 10:43 PM IST

नागपूर Gold Smuggling News : सोने तस्करीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार आज समोर आलाय. दोन तरुणांनी दुबई येथून स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २ किलो सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचे नागपूर विमानतळावर तपासणी दरम्यान उघडकीस आलीय. शाहीद नालबंद व पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर असे आरोपींचे नावं आहे. ते दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत.

नागपूर विमानतळावर आज पहाटे कतारवरून आलेल्या विमानाने दोन तरुण नागपूरला आले. त्यांच्या हालचालींवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. दोघांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून पेस्ट स्वरूपात दोन किलोहून अधिक सोन्याची पेस्ट आणल्याचं समोर आलं. दोनही आरोपींची सोन्याची पेस्ट कॅप्सूलमध्ये भरली होती. ते सोनं कॅप्सूल प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले होते.

आरोपींच्या हालचालींवर संशय: दोन व्यक्ती सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती कस्टम विभागाला आधीचं कळालेली होती. आरोपी शाहीद नालबंद आणि पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर विमानतळावर उतरले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटतं असल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून व त्यांची अंगझडती घेतली असता संशयास्पद काहीचं आढळून आले नाही. मात्र, ज्यावेळी आरोपींना चौकशीसाठी नेण्यात आले त्यानंतर आरोपीनी स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोन्याची पेस्ट ही लपवून आणल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. कस्टम अधिकाऱ्यांनी दोघांकडून तब्बल दोन किलोहून अधिक सोने जप्त करत दोघांना अटक केली आहे.

  • मुंबईतही नुकतेच मोठी कारवाई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटलिजन्स युनिटनं (सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्ष) सिंगापूरहून प्रवास करणाऱ्या एका भारतीय कुटुंबाकडून दोन किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची पावडर जप्त केलीय. या सोन्याचे बाजारातील मूल्य सुमारे सुमारे 1.05 कोटी रुपये आहे. एआययुच्या अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबरला ही कारवाई केल्यानंतर सोने तस्करीचे प्रमाण सुरुच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.
  • पुणे विमानतळावरही प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून तस्करी : यापूर्वी पुणे विमानतळावरही प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून तब्बल ३३ लाखांच्या सोन्याची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुणे विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केल्यानंतर सोने तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला होता.

हेही वाचा-

  1. Gold Smuggling : सिंगापूरहून भारतात सोन्याची तस्करी? मुंबई विमानतळावर कुटुंबाकडून एक कोटींची सोन्याची पावडर जप्त
  2. Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.