नागपूर - वाघाचा दात आणि मिश्यांसह दोन आरोपींना वनविभागाने अटक केली आहे. सुनिल कवडु जाधव आणि धिरसिंग महेद्रसिंग आडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई नागपूर वन विभागातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राने केलेली आहे.
![वनविभागाची धडक कारवाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-05-forest-department-action-7204462_28042022211221_2804f_1651160541_936.jpg)
वाघाचा दात आणि मिश्यांची विक्री नागपूर जिल्ह्यातील उमरेड ते भिवापूर रोडवरील टी पॉईंट येथे होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्याआधारे सापळा रचून कारवाई केली आहे. वन विभागाने दोन आरोपींना वाघाचे दात, मिश्यांसह अटक केली आहे. मात्र एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. वनविभागाने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.