नागपूर - विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रचार साहित्य तयार करून विकणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, आता डिजिटल माध्यमांद्वारे प्रचार केला जात आहे. त्यामुळे हे प्रचार साहित्य विकत घेणाऱ्यांची संख्या घटलेली आहे. त्याचा परिणाम या साहित्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर झाला आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाचे चिन्ह असलेले कटआऊट, उमेदवारांचे बॅनर, दुपट्टे आणि उमेदवारांच्या नावाची टी-शर्ट आदी साहित्याची गरज असते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हे चित्र दिसत नाही. निवडणुकीचा प्रचारासाठी डिजिटल साहित्यांची मागणी वाढताना दिसत आहे. तसेच उमेवाद सोशल मीडियावरच प्रचाराची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण देखील घटले आहे. त्यामुळे प्रचार साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.