नागपूर - आज देशभरात रमजान ईंद साजरी केली जात आहे. जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यानुसार देशभरात ईदची घोषणा करण्यात आली. नागपुरातदेखील जामा मशीद मोमीनपुरा आणि मुस्लीम फुटबॉल ग्राउंड मोमीनपुरा या भागात मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यात आली. येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजान महिण्यात येथील बाजारपेठ सजलेली असते. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. यावर्षी रमजानचा महिना 7 मे रोजी सुरू झाला असून 4 जून रोजी संपत आहे. रमजान हा महिना बरकती सहित ईबादतचा मानला जातो. रमजानला बरकतचा महिना मानला जातो. या महिन्यात रोजा सोबतच अल्लाहची आराधना केली जाते.महिनाभर एका खोलीतच बसून अल्लाहची ईबादत मुस्लीम बांधव करतात. शिवाय या महिन्यामध्ये आपल्या वर्षभराच्या कमाईचा काही हिस्सा गरिबांमध्ये दान (जकात) केला जातो. त्याचबरोबर आर्थिक दूर्बल असलेल्या लोकांना धान्य वाटप केले जाते, त्यास फित्रा असे म्हणतात. म्हणून रमजान ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते.