ETV Bharat / state

Daughter Killed Mother in Law : सासू-सुनेचं भांडण टोकाला; सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या

Daughter Killed Mother in Law : समाजात काही ना काही कारणावरून सासू-सुनांमध्ये वाद होत असतात. मात्र, एका सुनेने रागाच्या भरात आपल्या ८० वर्षीय सासूवर वार करून हत्या केली आहे. ही घटना नागपुरातील राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Nagpur Crime News
८० वर्षीय सासूची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 9:46 AM IST

नागपूर : Daughter Killed Mother in Law : नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने स्वतःच्या ८० वर्षीय सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हत्येची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे.

रोजच सासू-सुनांमध्ये वाद : प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला घटनेच्या काही मिनिटांमध्ये अटक केली आहे. ताराबाई आणि सून पूनम यांच्यामध्ये रोजचं कौटुंबिक कारणाने वाद व्हायचे. शनिवारी (2 सप्टेंबर) रात्री उशिरासुद्धा दोघींमध्ये भांडण झाले. तेव्हा पूनमने ताराबाईवर हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेत ताराबाईचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ताराबाई यांचा मुलगा हा कामाला बाहेर गेला होता, तर दोन नातवंडं मात्र घरातच होते.

सुनेवर सुरू आहेत उपचार : आरोपी सून पूनम आनंद शीघ्रकोपी असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सासू-सुनेत रोज वाद होत असल्याने, यात काही नवीन नसल्याने शेजारी देखील फारसे लक्ष घालत नव्हते. मात्र, पूनम असं देखील काही करू शकते यावर कुणाला विश्वास बसत नव्हता. तर पत्नीनेच आईची हत्या केल्याचे पाहून पती आनंद शिखरवार स्तब्ध झाले होते. त्यांना या घटनेचा मानसिक धक्का बसला आहे.

सासूची हत्या : याआधीही अशीच एक घटना अमरावती येथे घडली होती. धारदार शस्त्राने वार करुन सासूची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना टाकरखेडा पूर्णा येथे ( Mother In Law Kill Amravati ) घडली होती. तर यात पत्नी गंभीर जखमी झाली होती. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे ( वय 45 ) मृत महिलेचे, तर दिनेश बोरखडे असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा -

  1. Amravati Crime News : कुऱ्हाडीने सपासप वार करुन सासूची हत्या
  2. Ahmednagar Crime News: पत्नी- सासूचा खून करून फरार झालेल्या घरजावयाची आत्महत्या, खुनानंतर स्वतःच्या आईकडे सोपवली मुलगी
  3. Thane Crime News : माय-लेकीच्या खून प्रकरणाचे गुढ उलगडले... एका फोनमुळे आरोपी झाला गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.