नागपूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १४२ वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. भाजीपाला बाजारामध्ये मोठी गर्दी होत असल्याने, नागपूर शहराचे महापौर संदिप जोशी यांच्या संकल्पनेतून 'कम्युनिटी मॉर्केट' ही संकल्पना राबवली जात आहे. पण, कम्युनिटी मार्केटमध्ये देखील नागरिक तुंडूब गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.
नागपूरच्या सतरंजीपुरा हा कोरोना हॉटस्पॉट भाग आहे. भागापासून काही अंतरावर असलेल्या वर्धमान नगर येथील आकाश नगर प्ले ग्राउंडमध्ये भाजीपाला बाजार भरवला जात आहे. या बाजारामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महत्वाचे म्हणजे, नागरिक बाजारामध्ये भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा पाळलं नसल्याचे निदर्शनात आले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरी नागरिक याचे पालन करताना दिसत नाहीत. दरम्यान, नागपुरात भाजी मार्केटमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता कळमना आणि कॉटन मार्केट बंद करण्यात आले आणि शहरातील 25 मैदानात शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण या मैदानावर भरवण्यात येणाऱ्या बाजारामध्येदेखील नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
हेही वाचा - कोरोना वॉरिअर्स पोलिसांना स्वसंरक्षणासाठी केवळ मास्कचा आधार; पीपीई किट देण्याची गरज
हेही वाचा - ट्रक चालकाची कैफियत ऐकून ऑनलाईन चोराला फुटला पाझर; चोरीची अर्धी रक्कम केली परत!