नागपूर Nana Patole On Cabinet Minister : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे नुकसान करणार नाही, असं सरकार सांगत जरी असलं तरी तुमच्या मनात काय आहे हे जनतेला कळू द्या अशी मागणी त्यांनी केलीय. (Nana Patole Nagpur PC) राज्य जळत आहे. राज्याच्या संपत्तीचं नुकसान होत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून सरकार मूळ प्रश्नावरील लक्ष विचलित करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्यात अडीच लाख पदं रिक्त आहेत. नालायक आणि बधीर झालेलं हे सरकार आहे. आता जनताच त्यांना धडा शिकवेल असं देखील ते म्हणाले आहेत.
गुन्हेगार, माफियाला संरक्षण देणारं सरकार: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेलं नाही. जेलमध्ये बसलेल्या काही बगलबच्च्यांना सुविधा मिळत आहे. हे येरवडा बद्दल नाही तर राज्यातील सर्वच कारागृहाची हीच परिस्थिती आहे. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारं सरकार आहे, असा आरोप आमदार नाना पटोलेंनी केलाय.
भाजपाला आरक्षण व्यवस्था संपवायची आहे: भाजपाचा जातनिहाय गणनेला विरोध आहे. भाजपाला आरक्षण व्यवस्था संपवायची आहे. ते गरीब एक जात असल्याचे सांगत आहे. बिहारमध्ये जशी गणना झाली तशी देशात झाली पाहिजे; मात्र तसे होत नाही. म्हणून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातनिहाय गणना केली आहे, असे नाना पटोले यांची सांगितले.
ओबीसी आग आहे, नादाला लागू नका: ओबीसींना महाराष्ट्रात फक्त १९ टक्के आरक्षण आहे. गडचिरोलीत तर ओबीसी आरक्षणाची टक्केवारी ही केवळ २ टक्केचं आहे. मोदी सरकारनं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावूनही अजेंडा अद्याप ठरला नाही. यांना आरक्षणाची ५० टक्क्यांची मार्यादा सरकारला ओलांडायची नाही. ओबीसी आग आहे, त्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, हा आमचा इशारा आहे. ओबीसी समाजाला केवळ १९ टक्के आरक्षण मिळत आहे. राज्यात ओबीसीची संख्या ५६ टक्के आहे, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
केंद्रात व राज्यात तुमच्या विचारांचं सरकार: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले केंद्रासह राज्यात तुमच्याचं विचाराचं सरकार कार्यरत आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करण्याची मागणी सरकारकडे करावी, असं ते म्हणाले आहेत. सरसंघचालकांनी आता अखंड भारतासोबत मणिपूर आणि काश्मिरबाबतंही बोलावं. तिथे निवडणूक होत नाही. लोकांच्या अनेक समस्या असताना त्याबाबत बोलावं. त्यांना कुठला अखंड भारत हवा आहे? असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा: