नागपूर - राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (१६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. यासंदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करून बहिष्कारावर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी आज असलेल्या जागतिक चहा दिनाचा उल्लेख करत भाजपला टोला लगावला.
हेही वाचा - हेक्टरी २५ हजारांची मदत तत्काळ करावी, फडणवीसांची मागणी
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमात, आज नवीन आलेले सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत समस्यांवर संयुक्त चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आज जागतिक चहा दिनसुद्धा आहे. पण दुर्दैवाने भाजपने या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला, असे ट्विट त्यांनी केले आहे.
-
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमात आज नवीन आलेले सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत समस्यांवर संयुक्त चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आज #InternationalTeaDay सुद्धा आहे. पण दुर्दैवाने भाजपने या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमात आज नवीन आलेले सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत समस्यांवर संयुक्त चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आज #InternationalTeaDay सुद्धा आहे. पण दुर्दैवाने भाजपने या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 15, 2019हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमात आज नवीन आलेले सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत समस्यांवर संयुक्त चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आज #InternationalTeaDay सुद्धा आहे. पण दुर्दैवाने भाजपने या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 15, 2019
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून परंपरागत चहापानाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधीपक्ष बहिष्कार टाकत असल्याची परंपरा सुरू आहे. यावेळीसुद्धा ही परंपरा कायम राहिली आहे.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार