नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. ज्यामध्ये ओबीसी समाजाच्या सक्षम नेतृत्वाला संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपच्या नेतृत्वावर करण्यात आला आहे. यावर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत पक्षाने अन्यायाची भूमिका का घेतली, असा प्रश्न विचारणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल होऊ लागल्यानंतर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांचा समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. उमेदवारी नाकारण्याला राजकीय आणि जातीयवादी रंग देऊन भाजपला मतदान न करण्याचा, खोडसाळपणा करू नका, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. गेल्या 25 वर्षांत आपल्याला अनके जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. यावेळी पक्षाने पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवल्याने ती पार पडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.