नागपूर : खंडग्रास सूर्यग्रहणानंतर ( Continental Solar Eclipse ) पुन्हा एक खगोलीय घटना अनुभवायला मिळणार आहे. मंगळवारी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण (Chandragrasa lunar eclipse ) पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ % आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चन्द्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वाजता चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वाजता ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल. अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.
खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी असा असेल : ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खग्रास सूर्यग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया,उत्तर-दक्षिण अमेरिका,येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारतीय वेळेनुसार ८ तारखेला दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटांनी छायाकल्प चन्द्रग्रहनाला सुरवात होईल. त्यानंतर ०२ वाजून ३९ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल, ०३.४६ वा खग्रास ग्रहणाला सुरवात होईल तर ०५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ०६.१९ वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वा छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ ०२.१४ तास खंडग्रास काळ ०२.१५ तास खग्रास काळ ०१.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ०५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल.आणि ०७.२६ वा.ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण ग्रस्तोदित भाग लहान होत जाईल.
ग्रहण म्हणजे काय : सूर्य आणि चंद्र यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास ( penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते.
पुढच्या वर्षी चार ग्रहणाचा योग : दरवर्षी दोन तरी चन्द्रग्रहणे होतात. २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत. त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४ ऑक्टो रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८, २९ ऑक्टो २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे.
चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही : पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात. ग्रहणे हा केवळ उन्ह-सावल्यांचा खेळ असून त्याबधल अंधश्रद्धा मानने अगदी चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे. सर्व नागरिक आणि विध्यार्थ्यांनी ग्रहांचा वैद्न्यानिक दृष्ट्या अभ्यास केला पाहिजे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. पूर्व दिशेला क्षितिज दिसेल अश्या मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जावून साध्या डोळ्याने किंवा लहान द्वीनेत्री बायनोकुलरने ग्रहण पहावे.
भारतातील ग्रहण वेळा : भारतात अरुणाचल प्रदेशातून ०४.२३ वा जवळ जवळ खग्रास स्थितीतच चंद्रोदय होईल आणि ३ तास ग्रहण दिसेल, कोलकाता येथून ०४.५२ वा. २.३४ तास दिसेल, पटना येथून ०५.०० वा २.२५ तास दिसेल, वाराणसी येथून ०५.०९ वा. ०२.१६ तास दिसेल, लखनऊ येथे ०५.१५ वा २.१० तास दिसेल, दिल्ली येथे ०५.३१ वा. ९.५८ तास दिसेल, बिकानेर येथे ०५.५७ वा ९.४१ तास दिसेल तर भूज येथून ०६.१० वाजता आणि सर्वाधिक कमी काळ (१.१८ तास) ग्रहण दिसेल.
महाराष्ट्रातील ग्रहणाची वेळ : महाराष्ट्रातील ग्रहनाच्या वेळा ह्या खालील वेळा चंद्रोदयाच्या आहेत, ग्रहण क्षितिजावर चंद्र आल्यानंतर दिसेल. गडचिरोली येथून ग्रहणाला ०५.२९ वा सुरवात होईल आणि ०७.२६ वा ग्रहण संपेल, येथे सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे ग्रहण दिसेल आणि ग्रस्तोदित चंद्र ७०% दिसेल. चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता, नागपूर येथे ०५.३२ वाजता यवतमाळ येथे ०५.३७ वा., अकोला येथे ०५.४१ वा जळगाव येथे ०५.४६ वा., औरंगाबाद येथे ०५.५० वा नाशिक येथे ०५.५५ वा.,पुणे येथे ०५.५७ वा., मुंबई येथे ग्रहण ०६.०१ वाजता सुरु होऊन ०७.२६ वा ग्रहण संपेल. समुद्र किनारी भागात महाराष्ट्रात सर्वात कमी काळ म्हणजे १ तास २५ मिनिटेच ग्रहण दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली आहे.