ETV Bharat / state

नागपुरात गडकरींच्या विजयासाठी भाजपचे मंत्री-आमदार सक्रिय

नितीन गडकरींना विजयी करण्याच्या उद्देशाने नागपुरातील भाजपचे आजी-माजी मंत्री आमदार आणि कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले आहेत.

नागपुरात गडकरींच्या विजयासाठी भाजपचे मंत्री-आमदार सक्रिय
author img

By

Published : Mar 16, 2019, 10:42 PM IST

नागपूर - लोकसभेच्या जागेकरता भारतीय जनता पक्षाने अद्याप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. तरी नितीन गडकरी यांच्या विजयाकरिता नागपुरातील भाजपचे आजी-माजी मंत्री, आमदार सक्रिय झाले आहेत. यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा देखील समावेश आहे.

नागपुरात गडकरींच्या विजयासाठी भाजपचे मंत्री-आमदार सक्रिय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नियोजनबद्ध कामाकरिता ओळखले जातात. देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची संदर्भात झाकली मूठ सव्वा लाखाची हेच धोरण अवलंबले आहे. नागपुरच्या लोकसभा उमेदवारीकरता भाजपकडून नितीन गडकरी यांचे नाव अंतिम असले तरी अजून त्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. असे असताना देखील नितीन गडकरींना विजयी करण्याच्या उद्देशाने नागपुरातील भाजपचे आजी-माजी मंत्री आमदार आणि कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले आहेत.

यामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीचे क्लस्टर प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबत राज्याचे मंत्री प्रवीण पोटे यांना लोकसभेचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आमदार सुधाकर देशमुख हे निवडणूक प्रमुख असतील. याशिवाय आमदार सुधाकर कोळी निवडणूक संयोजक आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांना निवडणूक सहाय्यकाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी महापौर प्रवीण दटके यांच्याकडे निवडणूक सहप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी हे निवडणूक सहप्रमुख असणार आहेत. घोषणापत्र तयार करण्याची जबाबदारी आमदार गिरीश व्यास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या यादीत भाजपच्या 50 पदाधिकाऱ्यांची नावे असून ते विविध पातळींवर नितीन गडकरींसाठी काम करणार आहेत.

Intro:नागपूर लोकसभेच्या जागेकरिता भारतीय जनता पक्षाने अजून पर्यंत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी नितीन गडकरी यांच्या विजया करिता नागपुरातील भाजपचे आजी-माजी मंत्री आमदार सक्रिय झाले आहेत...यामध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा देखील समावेश आहे

Body:केंद्रीय मंत्री नितिन गडकरी नियोजनबद्ध कामां करिता ओळखले जातात.... देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची संदर्भात झाकली मूठ सव्वा लाखाची हेच धोरण अवलंबिले आहे नागपूरच्या लोकसभा उमेदवारीकरिता भाजपकडून नितीन गडकरी यांचे नाव अंतिम असले तरी अजून पर्यंत त्या नावांची घोषणा झालेली नाही असे असताना देखील नितीन गडकरींना विजय करण्याच्या उद्देशाने नागपुरातील भाजपचे आजी माजी मंत्री आमदार आणि कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले आहेत त्यामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीचे क्लस्टर प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे यासोबत राज्याचे मंत्री प्रवीण पोटे यांना लोकसभेचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आमदार सुधाकर देशमुख हे देखील निवडणूक प्रमुख असतील याशिवाय आमदार सुधाकर कोळी निवडणूक संयोजक आहेत आमदार कृष्णा खोपडे निवडणूक सहाय्यकाची जबाबदारी देण्यात आली आहे माजी महापौर प्रवीण दटके यांच्याकडे निवडणूक सह प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे एवढेच नाही तर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी हे देखील निवडणूक सहप्रमुख असणार आहेत याशिवाय घोषणापत्र तयार करण्याची जबाबदारी आमदार गिरीश व्यास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या यादीत भाजपच्या 50 पदाधिकाऱ्यांची ची नावे असून ते विविध पातळींवर नितीन गडकरी का काम करणार आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.