ETV Bharat / state

पोलिसांनी धाड टाकताच दैवी शक्तीचा दावा करणारा बाबा गारद.. म्हणे कोरोना क्षणार्धात पळवून लावतो - ढोंगी बाबा

जीवघेण्या कोरोनावर उपचाराचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाला नागपूर शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभम तायडे असे या बाबाचे नाव आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने या ढोंगी बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा ढोंगी बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असा दावा केला जात होता.

Bhondu Baba
Bhondu Baba
author img

By

Published : May 15, 2021, 3:16 PM IST

Updated : May 15, 2021, 3:31 PM IST

नागपूर - जीवघेण्या कोरोनावर उपचाराचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाला नागपूर शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभम तायडे असे या बाबाचे नाव आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने या ढोंगी बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा ढोंगी बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असा दावा केला जात होता. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ नुसार त्याला अटक करण्यात आली आहे. यासोबतच लॉकडाऊन असताना देखील भक्तांची गर्दी गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविराेधात दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात पोलिसांची भोंदू बाबाच्या दरबारावर धाड

आपल्या असलेल्या दैवी शक्तीच्या जोरावर कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावण्याचा अजब दावा करणारा ढोंगी बाबा म्हणजेच शुभम तायडे लोकांमध्ये असलेल्या भीतीचा गैरफायदा आपला गोरखधंदा वाढवण्यासाठी करत होता. मात्र त्याच्या या कारस्थानांची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने त्याचे मनसुबे उधळून लावले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशीलनगरात राहणारा ढोंगी बाबा शुभम तायडे नामक बाबाच्या विरोधात एका भक्ताने तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व पोलिसांच्या चमूने सापळा रचून त्याच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला आहे. बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो, स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. त्याअनुषंगाने पंचशीलनगर येथे सापळा रचण्यात आला होता.

पोलीस दिसताच बाबांचे फुसफुसने झाले बंद -

पोलिसांनी बाबाच्या दरबारात धाड टाकली तेव्हा तिथे ५० पेक्षा जास्त भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा सरपट होता, एवढंच नाही तर तो नागा सारखा फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले. पोलिसांनी अचानक धाड टाकल्यामुळे त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला. यावेळी पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ नुसार अटक केली आहे .

Last Updated : May 15, 2021, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.