ETV Bharat / state

Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज... - कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. राज्यात सुरू असलेल्या घडामोडीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याची चर्चा रंगू लागली आहे. आज नागपुरात कार्यकर्त्यांनी राज-उध्दव एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे.

Nagpur News
नागपुरात लावले बॅनर
author img

By

Published : Jul 6, 2023, 5:44 PM IST

कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर

नागपूर : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या दयनीय परिस्थितीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यां तीव्र इच्छा आहे. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे यासाठी नागपुरात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे.

महाराष्ट्राला तुमची गरज : राज्यात सुरू असलेल्या घडामोडीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याची चर्चा रंगू लागली आहे. नागपुरात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले आहे. महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. साहेब एकत्र या असा मजकूर या फलकावर आहे. नागपूरच्या रेशीमबाग चौकातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर हा फलक लावण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्त ‘ठाकरे सरकार’ हवे आहे - पक्ष कार्यकर्ते

राज-उध्दव एकत्र आल्यास : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आज एका पक्षात दिसत असलेले नेते सकाळी उठून दुसऱ्या पक्षात दिसू लागल्याने, राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी मजबूत विरोधकांची गरज आहे. अजित पवार बाहेर पडल्याने महाविकास आघाडी कमजोर झाली असताना, राज आणि उध्दव ठाकरें बंधू एकत्र आल्यास आश्वासक परिस्थिती निर्माण होईल. शिवाय मजबूत विरोधक म्हणून सरकारवरही वचक राहील अश्या भावना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही मागणी चांगलीच जोर धरत आहे. नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक भागात दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावे याकरिता बॅनर लावण्यात आले आहे.

दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला नियोजित चिपळूण दौरा अचानक रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अश्यात आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व मनसेचे अभिजित पानसे यांची भेट झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis अजित पवार गद्दारशरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे दिल्लीत लागले बॅनर
  2. Shinde vs Fadnavis : मुख्यमंत्री शिंदे गटाला डिवचणारे शहरात लागले बॅनर, राज्यात शिंदे यांच्या जाहिराती नंतर बॅनरवॉर
  3. Vikhe Patil Reaction On Thorat: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' बॅनरवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.