नागपूर- नवीन कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रणाळामध्ये १ महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून जीवे मारल्याची धक्कादायक घटना पुढे आलीय. रणाळाच्या सत्त धम्म बुद्ध विहार जवळील ही घटना आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.
हेही वाचा- खड्ड्यांमुळे नागपूरकरांची दमछाक, न्यायालयाने महापालिकेला फटकारले
घटनेचे मुख्य कारण समजल नाही. मात्र, पोलिसांनी मृत मुलीची आई पायल कानोजे आणि आजी पुस्तकला कानोजेला संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. मृत मुलीचा जन्म मोल मजुरी करणाऱ्या अनिल कनोजेच्या घरी जन्माष्टमीच्या दिवशी झाला होता. मात्र, जन्मताच तिची प्रकृती बरी नसल्याने तिचा उपचार सायली रुग्णलयात सुरू होता. उपचारात दिवसाला हजार रुपये खर्च होत होता. खर्च परवडणारा नसला तरी कुटुंबीयांनी मुलीवर उपचार सुरू ठेवला होता. मात्र, आज पहाटेच्या सुमारास ही घटना पुढे आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.