नागपूर - कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देणाऱ्या योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मूळ नागपूर असलेल्या, मात्र आता मुंबई गाजवणाऱ्या कलावंतांनी एक सुरेल गाणे तयार केले आहे. कोरोनासारखी 'लाखो संकट आली तरी मात करू त्यावर, एकजुटीन लढतोया आम्ही नागपुरकर' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून या कलावंतांनी एकजुटीचा संदेश दिला आहे. सध्या हे गाणे तुफान व्हायरल होत आहे.
आज कोरोनाविरुद्ध प्रत्येक जण लढा देत आहे. यात नागपुरकर देखील मागे नाहीत. यासाठी मराठी सिनेसृष्टीमधील नागपूरचे सर्व कलाकारांनी एकत्र येऊन एक गाणे तयार केले आहे. या गाण्याचे नागपुरात कौतुक होत आहे.
सर्व नागपुरकरांच्या वतीने हे गाणे नागपुरातील एकत्मतेला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आले आहे. यामध्ये गायक म्हणून विशाल जोगदेव आणि श्रद्धा यादव आवाज दिला आहे तर, गीत हे कुमार चिरंजीव याचे आहे.
गाण्यात यांचा सहभाग -
पार्श्वसंगीत - चारुदत्त जिचकर
संकल्पना - निर्मिती तुषार जोगदेव
व्हिडिओ संकलन - सम्राट गोटेकर
कलाकार - अभिजीत गुरू, देवेंद्र दोडके, विष्णू मनोहर, समिधा गुरू, मृणाल देशपांडे, राजेश चिटणीस, राधिका देशपांडे, मुकुंद वसूले, ज्योती आमगे, वत्सला पोलकमवार, मीना देशपांडे, शोभा बोंदरे, अनिल पालकर, सचिन गिरी, अंकिता बोंदरे, द्वारकेश महेंदळेकर व विशाल जोगदेव यांचा समावेश आहे.