नागपूर - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बाहेर आज आगळे-वेगळे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकास निधीला मोठ्या प्रमाणात कात्री लावल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकत आंदोलन केले. तर त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी देखील केंद्राने जीएसटीचा २८०० कोटी रुपयांचा परतावा लगेच द्यावा, या मागणी याकरिता आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. महत्वाचे म्हणजे प्रकाश गजभिये यांना विधिमंडळात नाविन्यपूर्ण आंदोलन करण्यासाठी ओळखले जाते.
हेही वाचा - नागपूर; दादागिरी करणाऱ्या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या
हेही वाचा - भाजपच्या अपप्रचाराला उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाची - अशोक चव्हाण