ETV Bharat / state

उपराजधानीत वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे - nagpur police bodyworn camera news

नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या कॅमेरांचे वाटप करण्यात आले. गुन्हेगारी रोखण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहे.

200 bodyworn cameras to ready to help traffic police in nagpur
उपराजधानीत वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:12 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या कॅमेरांचे वाटप करण्यात आले. या कॅमेराचा उपयोग पोलिसांवरील हल्ले रोखण्यास होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन सुरुवात महाराष्ट्रात झाली असल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी म्हटले.

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

हे कॅमेरे उपयुक्त ठरणार -

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांवर हल्ले होत आहे. कर्तव्य बजावताना अनेकदा काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात. उलटपक्षी बरेचदा पोलिसही नागरिकांशी सौजन्याने वगात नसल्याच्या तक्रारी येतात. या दोन्ही धर्तीवर गुन्हेगारी रोखण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहे. मुंबईनंतर आजपासून उपराजधानी नागपूरात सुद्धा कॅमेरे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे असणार आहे. यात सध्या नागपूर पोलिसांच्या ताफ्यात 5 ड्रोन आहे. हे 5 किलोमीटर रेडिअसमध्ये फिरून निरीक्षण आणि लक्ष ठेवू शकतात. यात पुढील काळात गरज असल्यास रिलायांसने सीएसआर फंडातून ज्या प्रकारे मुंबईला ड्रोन दिले. त्याच पद्धतीने घेता येईल, असेही ते म्हणाले.

गृहमंत्री म्हणून पाठीशी राहील -

शहरातील अनेक भागात सीसीटीव्ही लागले आहेत. याठिकाणी पब्लिक अनाऊन्समेट सिस्टमची मदत घेता येईल. मुंबईप्रमाणे ट्राफिक वार्डन सुरू करता येईल. तसेच 16 कोटींचे ई-चालान बाकी आहे. यासाठी एजन्सी नेमून त्याची वसुली करता येईल, तसेच गृहमंत्री म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहील, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन -

सायबर क्राईमचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँकेच्या नावावर गुन्हे घडत आहेत. लसीकरणाची उत्तम मोहीम सुरू झाली आहे. पण मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणासाठी नंबर लावून देतो म्हणत फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.

हेही वाचा - औरंगाबाद नामांतर : 5 वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.