ETV Bharat / state

आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 29 वा वाढदिवस माध्यम प्रतिनिधींसोबत - media representative

अभिनेत्री दिशा पटाणीसोबत नुकताच आदित्य ठाकरे डिनरला गेल्याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आज वाढदिवशी कुठे डिनरला जाणार असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आज संध्याकाळच जेवण घरीच करणार असल्याचे आदित्य यांनी हसत सांगितले.

आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 29 वा वाढदिवस माध्यम प्रतिनिधींसोबत
author img

By

Published : Jun 13, 2019, 5:04 PM IST

मुंबई - आज कोणी स्पेशल गिफ्ट किंवा शुभेच्छा दिल्या का यावर आदित्य यांनी लाजत हसून बोलणे टाळले. माझ्या हातून चांगले काम व्हावे ही इच्छा देवाकडे व्यक्त केली, रात्री सर्वांच्या शुभेच्छांना उत्तर देणार असल्याचे आदित्य म्हणाले.

आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 29 वा वाढदिवस माध्यम प्रतिनिधींसोबत

अभिनेत्री दिशा पटाणीसोबत नुकताच आदित्य ठाकरे डिनरला गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आज वाढदिवशी कुठे डिनरला जाणार ?असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता, आज संध्याकाळचं जेवण घरीच करणार असल्याचे आदित्य यांनी हसत सांगितले.

आदित्य यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा देखील त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर फुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांची विशेष सजावट केली होती. सकाळपासूनच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, सुजित चव्हाण, अमोल किर्तीकर या आदित्य यांच्या निकटवर्तीयांनी मातोश्रीवर ठाण मांडले आहे. आपल्या लाडक्या युवराजांना शुभेच्छा देण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबई व मुंबई बाहेरून मातोश्रीवर आले होते.

Intro:आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचा 29 वा वाढदिवस माध्यम प्रतिनिधींसोबत केक कापून साजरा केला
आज कोणी स्पेशल गिफ्ट किंवा शुभेच्छा दिल्या का यावर आदित्य यांनी लाजत हसून बोलणं टाळलं. माझ्या हातून चांगलं काम व्हावं ही इच्छा देवाकडे व्यक्त केली, तसेच रात्री सर्वांच्या शुभेच्छाना उत्तर देणार असल्याचे आदित्य म्हणाले.

Body:अभिनेत्री दिशा पटाणीसोबत नुकताच आदित्यचा डिनरला गेल्याच फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यामुळे आज वाढदिवशी कुठे डिनरला जाणार असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आज संध्याकाळच जेवण घरीच करणार असल्याचे आदित्य यांनी हसत सांगितले.
आदित्य यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा देखील त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.

Conclusion:युवराज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर फुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांची विशेष सजावट केली होती. सकाळपासूनच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, सुजित चव्हाण, अमोल किर्तीकर या आदित्य यांच्या निकटवर्तीयांनी मातोश्रीवर ठाण मांडले. तर आपल्या लाडक्या युवराजांना शुभेच्छा देण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबई व मुंबई बाहेरून मातोश्रीवर आले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.