ETV Bharat / state

आता तुम्हालाही पाहता येणार मतदान केंद्रावरील कामकाज; वेबकास्टिगव्दारे लाईव्ह प्रक्षेपण - निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाकडून यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये, मुंबई जिल्ह्यातील २६० मतदान केंद्रावर 'वेबकास्टिंग'ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. या वेबकास्टिंग प्रयोगामुळे मतदान केंद्रात चालणारे कामकाज लोकांना पाहता येणार आहे.

आता तुम्हालाही पाहता येणार मतदान केंद्रावरील कामकाज; वेबकास्टिगव्दारे लाईव्ह प्रक्षेपण
author img

By

Published : Apr 20, 2019, 7:05 PM IST

मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाकडून यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये, मुंबई जिल्ह्यातील २६० मतदान केंद्रावर 'वेबकास्टिंग'ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. या वेबकास्टिंग प्रयोगामुळे मतदान केंद्रात चालणारे कामकाज लोकांना पाहता येणार आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

माहिती देताना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी फिरोघ मुक्कादम

वेबकास्टिंग कुठे पाहता येणार -
कॉम्प्युटरवर लावलेल्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून कॉम्प्युटरसमोर घडलेल्या घटनेचे चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचवेळी दुसर्‍या कॉम्प्युटरवर तसेच पालक कॉम्प्युटरवर किंवा मोठ्या पडद्यावर उपलब्ध करून देणे म्हणजे वेबकास्टिंग. ते आयोगाला नियंत्रण कक्षात बघून पाहता येते. तसेच हेच चित्रण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन कुणालाही पाहता येणार आहे.

मुंबईत २९ एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील २६० संवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती मुंबई शहर उपजिल्हाधिकारी फिरोघ मुक्कादम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या हेतूने, प्रथम ईव्हीएम मशिनवरील संशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवरील हालचालींवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये वेबकास्टिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष निवडणूक आयोगास प्राप्त झाला. त्यामुले यावेळी वेबकास्टिंगची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती मुंबई निवडणूक यंत्रणेच्या व मुंबई शहराच्या उपजिल्हाधिकारी मुक्कादम यांनी दिली.

संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान काळातील हालचाली पाहण्यासाठी आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध होती. आता सामान्य मतदारांसाठीसुद्धा ही सेवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात येणाऱ्या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सीसीटीव्हीही नजर ठेवणार आहे. वेबकास्टिंगमुळे ही केंद्रे ऑनलाइन होणार आहेत. वेबकास्टिंगची लिंक आयोगाच्या वेबसाइटवर दिली जाणार असल्यामुळे प्रत्येक जण मतदान केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे.

निवडणुकांच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची माहिती देण्यासाठी १९५० ही टोल फ्री सेवा मतदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी राज्य निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाशी जोडलेली ही सेवा आता थेट संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षास जोडली आहे. परिणामी, कार्यवाही तत्काळ होऊ शकते, त्यामुळे निवडणूक आयोग आता पोलीस आणि अग्निशमन केंद्रांप्रमाणे जिल्हास्तरावर १९५० ही टोल फ्री दुरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे.

इंटरनेट सेवा बंद झाल्यास, कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहणार -
मुंबईमधील २६० संवेदनशील मतदान केंद्रांवर चित्रीकरणाकरिता कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे सर्व कॅमेरे इंटरनेटच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोग नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण कक्ष, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगड व मावळ निवडणूक नियंत्रण कक्षांशी जोडलेले राहतील. काही कारणास्तव इंटरनेट सेवा बंद पडली, तर मतदान केंद्रावरील कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहील आणि ते रेकॉर्डिंग सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीदेखील व्यवस्था वेबकास्टिंगटीमद्वारेच करण्यात येणार आहे.

Intro:चेरमन सरांच्या स्टोरी आयडीयानुसार ही बातमी 6 आहे

यंदा मुंबईत 260 ठिकाणी मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार

लोकसभा निवडणुकीची तयारी शासनाकडुन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्यात मुंबई जिल्हा क्षेत्रातील मतदार संघात मतदान केंद्रावर एकूण 260 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा यंदा भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याच वेबकास्टिंग करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट खासगी कंपनीना देण्यात आले आहे व त्यासाठी लागणारे अभियंते व कामगार तेच पाहणार आहेत. मतदान केंद्रात चालणार कामकाज हे लोकांना या वेबकास्टिंगद्वारे पाहता येणार आहे.अशी माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली

वेबकास्टिंग म्हणजे काय?

कॉम्प्युटरवर लावलेल्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून कॉम्प्युटरसमोर घडलेल्या घटनेचे चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचवेळी दुसर्‍या कॉम्प्युटरवर तसेच पालक कॉम्प्युटरवर किंवा मोठ्या पडद्यावर उपलब्ध करून देणे म्हणजे वेबकास्टिंग होय. ते आयोगाला नियंत्रण कक्षात बघून पाहता येतेच. पण महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाच्या विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन कुणालाही ते पाहता येईल.

मतदानाच्या दिवशी 29 एप्रिल लोकसभा मतदारसंघातील 260 संवेदनशील मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा मुंबई मतदार संघात भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती मुंबई शहर उपजिल्हाधिकारी फिरोघ मुक्कादम यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या हेतूने, प्रथम ईव्हीएम मशिनवरील संशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली सुरू केली आणि आता मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवरील हालचाली, सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेबकास्टिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षणाखाली राहणार आहेत.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये वेबकास्टिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम करण्यात आला, त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष निवडणूक आयोगास प्राप्त झाल्याने या वेळी वेबकास्टिंगची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती मुंबई निवडणूक यंत्रणेच्या व मुंबई शहराच्या उपजिल्हाधिकारी यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली आहे.

संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान काळातील हालचाली पाहण्यासाठी आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध होती. आता सामान्य मतदारांसाठीसुद्धा ही सेवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात येणाऱ्या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सीसीटीव्हीही नजर ठेवणार आहे. वेबकास्टिंगमुळे ही केंद्रे आॅनलाइन होणार आहेत. वेबकास्टिंगची लिंक आयोगाच्या वेबसाइटवर दिली जाणार असल्यामुळे प्रत्येक जण मतदान केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे. यामुळे मतदान केंद्रावरील स्थिती बघता येणार आहे.

निवडणुकांच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची माहिती देण्यासाठी १९५० ही टोल फ्री सेवा मतदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी राज्य निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाशी जोडलेली ही सेवा आता थेट संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षास जोडली आहे. परिणामी, कार्यवाही तत्काळ होऊ शकते, त्यामुळे निवडणूक आयोग आता पोलीस आणि अग्निशमन केंद्रांप्रमाणे जिल्हास्तरावर १९५० ही टोल फ्री दुरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे.

तसेच इंटरनेट सेवा बंद पडली, तरी मतदान केंद्रावरील कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहणार
मुंबईमधील 260 संवेदनशील मतदान केंद्रांवर चित्रीकरणाकरिता कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे सर्व कॅमेरे इंटरनेटच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोग नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण कक्ष, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगड व मावळ निवडणूक नियंत्रण कक्षांशी जोडलेले राहतील.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकच्या माध्यमातून जनसामान्यही या वेळी या केंद्रांवरील कामकाज थेट पाहू शकणार आहेत. काही कारणास्तव इंटरनेट सेवा बंद पडली, तर मतदान केंद्रावरील कॅमेºयांचे रेकॉर्डिंग सुरूच राहील आणि त्यांनी केलेले रेकॉर्डिंग या सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीदेखील व्यवस्था वेबकास्टिंगटीम द्वारेच करण्यात येणार आहे असे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.