ETV Bharat / state

Look Back 2022 : प्रमुख राजकीय नेत्यांचे 2022 मधील महाराष्ट्रातले दौरे; घ्या जाणून... - Year Ender 2022

Look Back 2022 : महाराष्ट्रात 2022 मध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी दौरे ( Political Leaders Visits Maharashtra ) केले. यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. तर गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत आले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्धव ठाकरे आमि शरद पवार यांची भेट घेतली (Year Ender 2022 ) होती.

Year Ender 2022
राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रातले दौरे
author img

By

Published : Dec 18, 2022, 4:42 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:25 PM IST

मुंबई : Look Back 2022 : नवे वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. देशाच्या राजकारणतील महत्त्वाच्या व्यक्तींनी महाराष्ट्रात 2022 मध्ये अनेक महत्त्वाचे दौरे ( Year Ender 2022 ) केले. काही निवडणूकांच्या पार्श्वभूमावीर महाराष्ट्रात आले तर काही धार्मिक कार्यक्रमाच्यानिमित्त राज्यात आले होते, तर कर राजकीय चढ-उतारांमुळे महाराष्ट्रातील नेत्याची भेट घेण्यासाठी आले ( Political Leaders Visits Maharashtra ) होते. टाकूयात एक नजर या सर्व गोष्टींवर

रामनाथ कोविंद यांचा पुणे दौरा : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 26 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती ( Dagdusheth Halwai Datta Mandir Trust ), लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई, दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली होती. त्यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे कोविंद यांचे स्वागत करण्यात ( Ram Nath Kovind in Pune ) आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचा सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी गणरायाचा सपत्नीक अभिषेक देखील केला होता. तसेच देशाच्या सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्नते करीता श्रीं कडे प्रार्थना केली होती. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी १०:५० वाजता बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दत्तमहाराजांची आरती केली होती. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. महावस्त्र, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कोविंद यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले होते. नवरात्रीनिमित्त मंदिरात सुरु असलेल्या तयारीची कोविंद यांनी पाहणी करण्यासोबतच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन रामनाथ कोविंद यांचा सन्मान करण्यात आला.

गणेशोत्सवादरम्यान अमित शाह मुंबईत : गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah Mumbai Visit ) यांनी रविवारी 4 सप्टेंबर रोजी मुंबई दौका केला . या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. अमित शाहांनी मुंबईतील विविध गणेश मंडळांना भेटी दिली. अमित शहा यांचे मुंबईत आमगनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन ( Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan ) घेतले. यावेळी त्यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी डोके टेकले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री Union Home Minister अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये भेट ( Director Rohit Shetty meet Amit Shah ) घेतली. या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. मात्र निवडणूका झाल्या नाहित. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमित शाहांनी या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली होती. संध्याकाळी त्यांनी पवई मुंबईतील ए. एम. नाईक या नवीन शाळेच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थिती लावली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल भाष्य केले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi Dehu Visit ) यांच्या हस्ते 14 जूनला जगद्गुरू तुकाराम महाराज ( Jagadguru Tukaram Maharaj ) यांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. चौदा वर्षांनंतर या मंदिराचे लोकार्पण ( PM Modi in Dehu Inaugurat Shila Temple ) झाले. सर्व सामान्यांच्या लोक सहभागातून हे मंदिर उभे राहिले. देहू संस्थांच्यावतीने मोठ्या संख्येने वारकरी, या मंदिराच्या लोकार्पणासाठी राज्य भरातून आले होते. हे मंदिर पूर्णपणे दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फुटांपर्यंत आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी आहे. आपल्या वातावरणाला सूट होतील, असे दगड वापरण्यात आले आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातुन तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर बसले होते. ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर 11 हजार करोडपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 5 टप्पात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 3 टप्प्यात पूर्ण होणार असून सर्व टप्प्यात 350 किलो मिटर पेक्षा जास्त हायवे हे बनणार असल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी भाषणात मराठी भाषेचाही वापर केला. छत्रपती शिवाजी महाराज, स्वतंत्र्य वीर सावरकर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा आणि त्यांच्या खडतर जिवनाचा उल्लेख केला.

केसीआर यांचा मुंबई दौरा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्धव ठाकरेंना सतार भेट ( KCR Meet Uddhav Thackeray ) दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत ( KCR visit Mumbai ) केले. केसीआर आणि ठाकरे यांच्यामध्ये 'चाय पे चर्चा' झाली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी दोघांनी चहा घेत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. तत्पूर्वी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत पोहोचल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांचे स्वागत केले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेलंगणातील अन्य नेतेही आले आहेत. शरद पवार यांच्या ( KCR Meet Sharad Pawar) घरी सुप्रिया सुळे त्याचे पती सदानंद सुळे आणि मुलगी यांनी त्यांचे स्वागत केले. कोणतीही राजकीय अस्पृश्यता न बाळगता देशातील समविचारी पक्षांची मोट बांधणे आवश्यक आहे. केंद्रातील अन्यायी सरकारच्या विरोधात एकसंघ होऊन लढण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी याची गरज असल्याचे केसीआर यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण दिले. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी शरद पवारांना आघाडीमध्ये सामील होण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंना भेटून प्रसन्न वाटले. अनेक मुद्द्यांवर आमची सहमती झाली. देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आमची चर्चा झाली. सर्व विषयांवर आम्ही एकजूट झालो असे केसीआर यांनी या दौऱयादरम्यान म्हटले.

Last Updated : Dec 22, 2022, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.