मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस शिपाई भरतीमध्ये, पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी म्हणजेच 2 एप्रिलला सकाळी साडेआठ वाजता घेण्यात येणार आहे. यात मुंबई शहर वगळता राज्यातील पात्र उमेदवार या परीक्षेला बसू शकणार आहेत.
परीक्षेची प्रवेश पत्र: पोलीस शिपाई पदाकरता विविध घटकांत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, लेखी परीक्षेची प्रवेश पत्र हे महाआयटी विभागातर्फे ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दोन तास आधी पोहोचण्याची सूचना राज्य पोलीस दलाच्या प्रशिक्षण आणि खास पथकाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करण्यास काही अडचण येत असल्यास त्यांनी संबंधित घटक प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही या विभागाकडून करण्यात आले आहे.
इतके आले अर्ज आले: मुंबई चालक पदासाठी 5 हजार पाचशे महिला उमेदवार रांगेत आहेत. त्याचप्रमाणे 1 लाख 16 हजार पुरुष उमेदवारांनी हे मुंबई चालक पदासाठी अर्ज केला आहे. या आकडेवारीवरून चालक पदासाठी महिलांची धडपड दिसू येत आहे. राज्यभरात 12 लाखापेक्षा अधिक जण या पोलीस भरतीच्या रांगेत आहेत. 14 हजार 956 पोलीस शिपाई पदासाठी भरती सुरू आहे. यासाठी एकूण 12 लाख 25 हजार 899 उमेदवार भरतीच्या प्रक्रियेत सामील झाले आहेत. मुंबईत सात हजार पदांसाठी पावणे सहा लाख अर्ज आले आहेत. मुंबई पोलीस दलात 776 शिपाई पदांसाठी एकूण 5 लाख 81 हजार 301 अर्ज आले आहे. यामध्ये चार लाख 84 हजार 701 पुरुष उमेदवार, तर 96 हजार 580 महिला उमेदवार रिंगणात आहे.
अत्यंत महत्त्वाच्या सूचना: पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि खाकी वरती अंगावर परिधान करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाईसाठी असलेली ही महत्त्वाची संधी आहे.परीक्षेला जाताना काळजी घ्या म्हणजेच महत्त्वाचे कागदपत्रे जवळ ठेवा. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट) देखील सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. या हॉल तिकीट शिवाय परीक्षेला बसण्यास परवानगी मिळणार नाही. तसेच स्वतःचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी किंवा पासपोर्ट आधी कागदपत्र ओळखपत्र म्हणून जवळच असणे अत्यावश्यक्य आहे. त्याचप्रमाणे घाई गडबड होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या प्रशिक्षण व खास पथके या विभागाचे विशेष पोलीस निरीक्षक यांनी परीक्षा केंद्रावर उमेदवारांना दोन तास अगोदर येण्याची सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा: Police Recruitment 2023 पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस भरतीसाठी मैदान मिळवण्याचे आव्हान