मीरा भाईंदर : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवस मुंबईतील मीरा रोड येथे दरबार आहे. आज रविवारी दरबाराचा शेवटचा दिवस असून शनिवारी लागलेल्या दरबाराहून अधिक गर्दी रविवारच्या दरबारात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बाबाच्या दरबारात आलेल्या श्रद्धाळूनचे दागिने चोरी झाल्याने बाबाच्या समर्थकांचा त्यांच्या बोलण्यावरून विश्वास उडाला आहे. अशाच एक आहेत बोरिवली येथे राहणाऱ्या सुनीता गवळी आहेत. त्यांचे जवळपास दीड लाखांचं मंगळसूत्र चोरी झाल्याने त्यांचा धीरेंद्र शास्त्रीवरचा विश्वास उडल्याच सांगितले.
आमच्यासोबत चुकीचे घडले : झालं असे की, सुनीता गवळी यांच्या मुलीची तब्बेत मागील अनेक दिवस बिघडलेली आहे. डॉक्टरांना दाखवले पण काही परिणाम झाला नाही. जेव्हा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. ते चिठ्ठी काढून लोकांच्या मनातील प्रश्न जाणून घेतात. त्यांच्या समस्या सोडवतात. हे मी सर्व मोबाईवर पाहिले आहे. मला आशा होती बाबा माझ्या मुलीच्या नावाची चिठ्ठी काढतील. आमची समस्या सोडवतील. पण, इथं मात्र आमच्यासोबत चुकीचे घडले, अशी प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली.
त्यांच्यावरच विश्वास उडाला : सुनीता गवळी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'मी इथे माझ्या मुलीची समस्या सोडवायला आले होते. पण, इथे माझे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. इथे माझी समस्या दूर न होता दीड लाखांचे नुकसान झाले. आधी वाटले होते बाबा काहीतरी करतील पण आता त्यांच्याच दरबारात माझे मंगळसूत्र चोरी झाल्याने आता त्यांच्यावरच विश्वास उडाला. मी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी एका वहीवर माझी तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, धीरेंद्र बाबाच्या दरबाराला शनिवारहुन अधिक गर्दी रविवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी बाबाच्या दरबाराला साधारण 2 लाख श्रद्धाळू आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध : ठाण्यातील मीरा भाईंदर येथे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मीरा भाईंदर येथे हा चालणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध केला होता. तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे शाम मानव यांनी पोलिसांनी बाबावग गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच बाबने दिव्य शक्ती सिद्ध केल्यास 30 लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा शाम मानव यांनी केली होती. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा वाद थेट न्यायालयसुद्धा पोबहचाला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यानंतर त्यांच्या दिव्य दर्शन दरबाराचा पहिला दिवस पूर्ण झाला आहे.