ETV Bharat / state

Mumbai Airport : विमानतळावर सामान अतिरिक्त झाल्याने कर्मचाऱ्यांनी मागितले पैसे; महिलेने असे काही सांगितले की थेट पोलिसांनी अटकच केली - मुंबई विमानतळ बॉम्ब अफवा

सामानात बॉम्ब ठेवण्याचा दावा करणाऱ्या एका प्रवासी महिलेला मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई विमानतळावर हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी त्या प्रवासी महिलेवर कलम 336 आणि 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 1, 2023, 3:49 PM IST

Updated : Jun 1, 2023, 4:00 PM IST

मुंबई - विमानतळावर सामान जास्तीचे झाले तर विमान कर्मचारी त्याचे अधिकचे पैसे आकारतात. त्यामुळे अनेक प्रवासी वेगवेगळे कारणे सांगून जादा सामानाचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न असतात. असाच प्रयत्न एका प्रवासी महिलेच्या चांगलाच अंगलट आला आहे. तिने सांगितलेल्या कारणामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. नंतर तिला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.

  • Maharashtra | Sahar PS registered a case under sections 336 and 505 (2) of IPC and arrested a woman at Mumbai airport after she falsely claimed that she was carrying a bomb in her baggage on being asked to pay up for extra luggage by the staff. The woman was about to board a…

    — ANI (@ANI) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सामानात बॉम्ब ठेवण्याचा दावा - एक प्रवासी महिला मुंबई विमानतळावरून कोलकाताला जात होती. प्रवास करण्यासाठी ती मुंबई विमानतळावर पोहचली होती. मात्र, तिथे आल्यानंतर विमान कंपनीने दिलेल्या सामानाच्या वजनापेक्षा जास्त वजन त्या प्रवासी महिलेच्या सामानाचे झाले होते. त्यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्या प्रवासी महिलेकडे जादा पैशांची मागणी केली. त्यावेळी त्या महिलेने या सामानात बॉम्ब ठेवण्याचा दावा केला होता. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.

गुन्हा दाखल - यासर्व प्रकारानंतर विमान कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती लगेच संबंधित पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या प्रवासी महिलेला अटक केली आहे. तिच्यावर सहार पोलिसांनी आयपीसीच्या कलम 336 आणि 505 (2) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही महिला मुंबईहून कोलकात्याच्या विमानात बसणार होती. नंतर तिला न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मिळाला आहे.

बॉम्बच्या अफवा - मागील काही दिवसांपासून मुंबईत बॉम्ब हल्ल्याच्या अनेक धमक्या देण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांना या धमक्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट असतात. मुंबई विमानतळ देखील कडेकोट सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली सुरू असते. मागील आठवड्यात नवी मुंबईत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी पोलिसांनी लगेच ऑपरेशर राबवत शोध सुरू केला. मात्र, ही अफवा असल्याची माहिती नंतर समोर आली होती.

हेही वाचा -

  1. Suspected Bomb : नवी मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन; चौकशीत माहिती उघड
  2. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक

Last Updated : Jun 1, 2023, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.