ETV Bharat / state

शाब्बास! धारावीने करून दाखवले; जागतिक आरोग्य संघटनेने दिली कौतुकाची थाप - जागतिक आरोग्य संघटना बीएमसी कौतुक

धारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. महानगरपालिका आणि शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 'मिशन धारावी' हाती घेतले. अवघ्या दोन महिन्यात महानगरपालिकेने धारावीतील कोरोना नियंत्रणात आणला. आज जगभरात 'मिशन धारावी'चे कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रायेसस यांनी 'मिशन धारावी'चे कौतुक केले.

Dharavi
धारावी
author img

By

Published : Jul 11, 2020, 12:38 PM IST

मुंबई - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची नकारात्मक ओळख आहे. मात्र, आता याच धारावीची आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक ओळख निर्माण झाली आहे. दाट लोकवस्ती असताना ही धारावीतील कोरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे नियंत्रणात आणल्याबद्दल धारावीचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थेट जागतिक आरोग्य संघटनेने तोंड भरून कौतुक केले आहे. केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो, असे म्हणत आरोग्य संघटनेने 'मिशन धारावी'चे कौतुक केले. या कौतुकाबद्दल मुंबई महानगरपालिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले आहे.

धारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. धारावीत दहा लाखांहून अधिक लोक वास्तव्याला आहेत. याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात 'पर्सनल स्पेस' ही संकल्पनाच अस्तित्त्वात नाही. एका छोट्याश्या खोलीत आठ-दहा लोक झोपतात, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यास, सांगणे हाच मुळात विनोद आहे. त्यामुळेच, याठिकाणी कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याचे सगळ्यात मोठे आव्हान प्रशासनापुढे होते.

धारावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली होती. दाट लोकवस्ती असल्याने येथे कोरोनाचा कहर माजण्याची भीती व्यक्त करत उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. दरम्यान, महानगरपालिका आणि शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 'मिशन धारावी' हाती घेतले. अवघ्या दोन महिन्यात महानगरपालिकेने धारावीतील कोरोना नियंत्रणात आणला. आज जगभरात 'मिशन धारावी'चे कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रायेसस यांनी 'मिशन धारावी'चे कौतुक केले.

रूग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत, त्यांच्या चाचण्या करत, विलगीकरण करत महानगरपालिकेने धारावीतील कोरोना नियंत्रणात आणला. हेच धारावी मॉडेल कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असेही गेब्रायेसस यांनी म्हटले आहे. नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या संकटावर मात करता येते, हे धारावीने दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेनेच पाठ थोपटल्याने आता मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून महानगरपालिका आणि राज्य सरकारचे कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.