मुंबई : किरीट सोमय्या कायम महाविकास आघाडी सरकारमधील विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या निकटवर्तियांवरही इडीची कारवाई सुरु आहे. हा वाद चांगलाच चिघळलेला असताना संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या त्यांचा मुलगा निल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. तसेच केंद्रिय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) विशेषत: इडीवर आरोप केले होते. नंतर त्यांनी असे अनेक घोटाळे उघडकीस आनणार असल्याचे म्हणले होते.
-
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
">Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTsWill be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
त्यानंतर सोमय्या आणि राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच राहिले. त्या नंतर आता गेल्या काहि दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशभरात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. राऊत स्वत: आणि सामनाच्या माध्यमातुन कायम टिकास्त्र सोडत असतात. आज त्यांनी ट्विट करत उद्या दुपारी 4 वाजता शिवसेना भवणात पत्रकार परिषद घेणार असल्याचे कळवले आहे. यावेळी त्यांच्या टार्गेटवर कोण असणार यावेळी ते कोणावर निषाना साधणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे. वायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतो असा दावा करत संजय राऊत यांनी अनेकवेळा केला त्या संबंधातील पुरावे पीएमओकडे दिल्याचे म्हटले होते. काही अधिकारी खंडणीचं रॅकेट वसुली एजंटातर्फे चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते.