मुंबई : माणकोली ते मोठागाव जोडरस्ता ( Mankoli to Moghargaon road ) प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. प्रकल्पात जलवाहतूक आणि मासेमारी होड्या यांना गैरसोय होऊ नये यासाठी पुलाच्या खांबांमधील अंतर आणि उंची योग्यप्रमाणात राखण्यात आलेली आहे. बॅलेन्स कॅन्टिलिव्हरच्या ( Balance Cantilever ) सहाय्याने २४५ मीटर लांबीच्या स्पॅनचे बांधकाम खाडीवरच करण्यात येत आहे.
प्रकल्पाची स्थिती - ठाणे जिल्ह्यातील उल्हासखाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या स्पॅनचे काम ७६.५८ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील हा आव्हानात्मक भाग असल्यामुळे, हा भाग पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. कल्याण-डोंबिवली वरून ठाणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुसह्य करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱ्या, १.३ किमी लांबीच्या माणकोली ते मोठागाव जोडरस्ता प्रकल्पात मानकोली पोहोच रस्त्याचे काम प्रगतीथावर असून मोटागाव पोहोच रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
ह्या गावांना होणार फायदा - या प्रकल्पामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता मुंबईच्या दिशेने थेट प्रवास करता येईल. त्यामुळे कल्याण डोंबिवलीवरून ठाणे - मुंबई दरम्यान वाहतुकीच्या वेळेत सुमारे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाने ८२.०५ टक्के प्रगती केली आहे.
मच्छिमार कोळी बांधवांची भमिका - यासंदर्भात मासेमारी करणारे आणि त्यातले अनुभवी तज्ञ व्यक्ती नंदकुमार पवार यांनी ईटीव्ही सोबत बोलताना सांगितले की, ''आम्ही सातत्याने समुद्रात उभे राहणाऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात ओरड करत होतो की, ब्रिजची उंची आणि दोन पिलर खांबा मधील अंतर हे व्यवस्थित असले पाहिजे अन्यथा त्यामुळे धोका उत्पन्न होतो. जेणेकरून मासेमारी करणाऱ्या बोटी यांना त्याचा अडथळा होऊ नये व विना अडथळा मासेमारी करता यावी ही सूचना आम्ही अनेक वर्षापासून शासनाला सांगत होतो. वांद्रे वरळी सी लिंक समुद्रामध्ये पूल बांधताना दोन पिलर मधील अंतर किती असावे, कसे असावे याबाबत आम्ही शासनाला सूचना केल्या होत्या. त्यावेळेला शासनाने ऐकले नाही. बऱ्याचदा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी ये-जा करत असतात तेव्हा त्या बोटी या पिलावर जाऊन आढळतात वारा तुफान असतो आणि हेवी करंट आत मध्ये सुरू असतो आणि त्याच वेळेला बोटी या पिलर वर जाऊन आढळतात.''
शासनाने विचार करावा - पुढे ते नमूद करतात की, ''यामुळे आर्थिक नुकसान होते, जीवित हानी देखील होते. मात्र मानकोली ते मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पा दरम्यान या चुका शासनाने टाळलेला आहे. त्याबद्दल त्याचे स्वागतच आहे, परंतु मच्छीमारांवर संकट उडवणारे कोस्टल रोड प्रकल्प असेल वांद्रे वरळी श्री लिंक असेल ट्रान्सफर लिंक प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प राबवतांना मासेमारी करणाऱ्या आगरी कोळी जनतेचे हित शासनाने त्यामध्ये पाहिले पाहिजे. या प्रकल्पांसाठी समुद्रामध्ये मोठ्या पद्धतीने ड्रिलिंग केल्या जात मोठ्या पद्धतीने पिलर उभारण्यासाठी खोलवर जाऊन जमीन खुदाई केली जाते त्यामुळे मासेमारी साठी मासेस उपलब्ध होत नाही कारण जे मासे खाजण जागेमध्ये वस्तीला येत असतात, ती जागाच यामुळे नष्ट होते त्यामुळे शासनाने याचा देखील विचार करायला हवा.''