मुंबई- भाजपच्यावतीने देशात ठिकठिकाणी 'मै भी चौकीदार' या व्हिडीओ कॉन्फरंस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी भाडे तत्त्वार आणलेले पहारेकरीच भर कार्यक्रमात झोपा काढताना दिसून आले. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
भाजपच्यावतीने अनेक ठिकाणी 'मै भी चौकीदार' नावाने व्हिडीओ कॉन्फरंस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओ कॉन्फरंसच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. मुंबईतसुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आर.एन.सिंह या भाजपच्याच उत्तर भारतीय आमदाराच्या बिस' सिक्युरीटी एजन्सीतून काही पहारेकरी जादा पैसे देऊन बोलवण्यात आले होते. मात्र, मोदींचा हा व्हिडीओ कॉन्फरंस कार्यक्रम दीड तास चालल्यामुळे आणि नंतर नंतर रटाळ होत असल्यामुळे हे पहारेकरी चक्क झोपा काढताना दिसून आले. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे चौकीदार ही चोर है.. अशी हलक्या आवाजात घोषणा दिल्या जात होत्या