मुंबई - चेंबूरमधील दलीत वस्तीतील मतदान केंद्रांवर सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. अबाल-वृद्धांपासून ते तरुण मतदारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे.
चेंबूर परिसर दक्षीण-मध्य मुंबई मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दलीत-मुस्लीम मतदारांची संख्या आहे. या मतदारसंघातील सिद्धार्थ कॉलनी, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर नाका परिसरातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. शिवाय चेंबूर रेल्वे स्थानक पश्चिम येथील संवेदनशील केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.