ETV Bharat / state

यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे... - कल्याण ग्राणीमध्ये मनसेला विजय

माझ्या हातात सत्ता नको विरोधी पक्षाची धुरा द्या, असं सागणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ १ जागा मिळाली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील  हे विजयी झाले आहेत.  मात्र, मनसेला जनतेने का नाकारले पाहा याची कारणे...

यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच?
author img

By

Published : Oct 25, 2019, 4:51 PM IST

Updated : Oct 25, 2019, 11:56 PM IST

मुंबई - राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपला असून, सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील सर्वात जास्त म्हणजे १०५ जागा या भाजपला मिळाल्या आहेत. तर त्याखालोखाल शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४, काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. मात्र, माझ्या हातात सत्ता नको विरोधी पक्षाची धुरा द्या असं सागणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील हे विजयी झाले आहेत. मात्र, मनसेला जनतेने का नाकारले पाहा याची कारणे...

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षीत यश मिळाले नाही. राज्यात मनसेने १०४ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत खमक्या विरोधी पक्षनेता हवा असे म्हणत राज ठाकरेंनी विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्यावी असे आवाहन केले होते. मात्र, जनतेने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या प्रभावी भाषणाचा विधानसभेच्या निवडणुकीत काहीही प्रभाव झालेला दिसून आला नसल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.

मनसेच्या पराभवाची ही आहेत ५ कारणे

१) ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय

यावेळची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंच्या मनात संभ्रम होता. निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरेंनी अगदी शेवटी घेतला. आचारसंहिता लागू होण्याच्या आदी हा निर्णय घेतला. त्यांनी निवडणुकीच्या अनुशंघाने काहीही पूर्वतयारी केल्याचे दिसून आले नाही. कदाचित त्याचाही फटका त्यांना बसला असावा.

२) दुसरी फळी सक्रीय नाही

मनसेमध्ये राज ठाकरे सोडले तर पक्षातील दुसऱ्या फळीचे नेते फारसे सक्रिय होताना दिसले नाहीत. मनसेकडे राज ठाकरेंच्या नंतर दुसरा कोणी मोठा चेहरा नाही. सर्व पक्षाची धुरा ही केवळ राज ठाकरेंच्या खांद्यावर आहे. कदाचीत त्याचाही पक्षाला कुठतरी तोटा झाला आहे.

३) २००९ मध्ये असणारी विश्वासार्हता यावेळी नव्हती

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची जनतेमध्ये जी विश्वासार्हता होती, ती यावेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाली नाही. राज ठाकरेंनी या निवडणुकीत जे मुद्दे मांडले ते लोकांनी कदाचीत पटले नसावेत. त्यामुळे जनतेने त्यांना साथ दिली नसावी.

४) सभेला गर्दी, मात्र मतात रुपांतर नाही

राज ठाकरेंच्या सभेला विशेषत: तरुणांची मोठी गर्दी होते. मात्र, या गर्दीचे रुपांतर कुठेही मतात झाल्याचे दिसले नाही. राज ठाकरेंचे भाषण केवळ मनोरंजन म्हणूनच लोक ऐकतात की काय? असा प्रश्न पडला तर वेगले वाटण्याची गरज नाही. कारण ज्या प्रमाणात त्यांच्या सभेला गर्दी होते, ती गर्दी राज ठाकरेंना मतात परिवर्तन करता आली नाही. त्याचा मोठा फटका त्यांच्या पक्षाला बसला आहे.

५) निवडणुकीच्या काळातच सक्रीय

राज ठाकरे हे केवळ निवडणुकीच्या काळातच सक्रिय होताना दिसतात. राजकारणामध्ये जर टिकायचे असेल तर सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत संपर्क असावा लागतो. मात्र, राज ठाकरे हे शहरी भागापुरतेच मर्यादीत राहत असल्याचे चित्र दिसते आहे. निवडणुका झाल्यानंतर ते फारसे सक्रिय असताना दिसत नाहीत. कदाचीच लोकांनी त्यामुळेच त्यांना नाकारले असावे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद सोनवने यांनीही मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही यावेळी पराभवचा धक्का बसला. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते.

Intro:Body:

यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...

मुंबई -  राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपला असून, सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील सर्वात जास्त म्हणजे १०५ जागा या भाजपला मिळाल्या आहेत. तर त्याखालोखाल शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४, काँग्रेसला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र, माझ्या हातात सत्ता नको विरोधी पक्षाची धुरा द्या असं सागणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील  हे विजयी झाले आहेत.  मात्र, मनसेला जनतेने का नाकारले पाहा याची कारणे...

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षीत यश मिळाले नाही. राज्यात मनसेने जवळपास....जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत खमक्या विरोधी पक्षनेता हवा असे म्हणत राज ठाकरेंनी विरोधी पक्षाची धुरा माझ्या हातात द्यावी असे आवाहन केले होते. मात्र, जनतेने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या प्रभावी भाषणाचा विधानसभेच्या निवडणुकीत काहीह प्रभाव झालेला दिसून आला नसल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.

मनसेच्या पराभवाची ही आहेत ५ कारणे

ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय

यावेळची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंच्या मनात संभ्रम होता. निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरेंनी अगदी शेवटी घेतला. आचारसंहिता लागू होण्याच्या आदी हा निर्णय घेतला. त्यांनी निवडणुकीच्या अनुशंघाने काहीही पूर्वतयारी केल्याचे दिसून आले नाही. कदाचित त्याचाही फटका त्यांना बसला असावा.

दुसरी फळी सक्रीय नाही

मनसेमध्ये राज ठाकरे सोडले तर पक्षातील दुसऱ्या फळीचे नेते फारसे सक्रिय होताना दिसले नाहीत. मनसेकडे राज ठाकरेंच्या नंतर दुसरा कोणी मोठा चेहरा नाही. सर्व पक्षाची धुरा ही केवळ राज ठाकरेंच्या खांद्यावर आहे. कदाचीत त्याचाही पक्षाला कुठतरी तोटा झाला आहे.

२००९ मध्ये असणारी विश्वासार्हता यावेळी नव्हती

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची जनतेमध्ये जी विश्वासार्हता होती, ती यावेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाली नाही. राज ठाकरेंनी या निवडणुकीत जे मुद्दे मांडले ते लोकांनी कदाचीत पटले नसावेत. त्यामुळे जनतेने त्यांना साथ दिली नसावी.

सभेला गर्दी, मात्र मतात रुपांतर नाही

राज ठाकरेंच्या सभेला विशेषत: तरुणांची मोठी गर्दी होते. मात्र, या गर्दीचे रुपांतर कुठेही मतात झाल्याचे दिसले नाही. राज ठाकरेंचे भाषण केवळ मनोरंजन म्हणूनच लोक ऐकतात की काय? असा प्रश्न पडला तर वेगले वाटण्याची गरज नाही. कारण ज्या प्रमाणात त्यांच्या सभेला गर्दी होते, ती गर्दी राज ठाकरेंना मतात परिवर्तन करता आली नाही. त्याचा मोठा फटका त्यांच्या पक्षाला बसला आहे.

निवडणुकीच्या काळातच सक्रीय

राज ठाकरे हे केवळ निवडणुकीच्या काळातच सक्रिय होताना दिसतात. राजकारणामध्ये जर टिकायचे असेल तर सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत संपर्क असावा लागतो. मात्र, राज ठाकरे हे शहरी भागापुरतेच मर्यादीत राहत असल्याचे चित्र दिसते आहे. निवडणुका झाल्यानंतर ते फारसे सक्रिय असताना दिसत नाहीत. कदाचीच लोकांनी त्यामुळेच त्यांना नाकारले असावे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद सोनवने यांनीही मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही यावेळी पराभवचा धक्का बसला. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते.

Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.