मुंबई : राज्यातील सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. या संमेलनात विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य उपस्थित होते. चांगला प्रतिसाद या संमेलनाला मिळाला आहे. संसदिय आणि पर्लिमेंटरी कामकाज कसे चालावे, याविषयी मंथन झाले.
विधानसभा आणि विधापरिषद बाबत चर्चा : वेगवेगळ्या राज्यतील चांगल्या प्रकारे कामकाज करणाऱ्या विधानसभा आणि विधापरिषद बाबत चर्चा झाल्या. अनेक सत्र होते, अनेक विषयावर चर्चा झाली. या संमेलनामुळे दोन्ही सभागृहातील आमदारांना फायदा होणार आहेच. त्यांच्यामार्फत सामान्य जनतेलाही फायदा होणार आहे. राज्यात कोणत्याही प्रकारचा सत्ता संघर्ष नाही. सगळे व्यवस्थित सुरु असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या घटनेवर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे विधानसभा अध्यक्षांनी त्यानुसार सेनेची घटना मागवली आहे. विधानसभा अध्यक्षांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे. नुकतेच शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे.
घटना तपासून कारवाई करणार : निवडणूक आयोगाकडील घटना तपासून न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कारवाई करणार आहेत. ही कार्यवाही आयोगाच्या माहितीनुसार होईल. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना त्यांचे अधिकार आहेत. ते योग्य निर्णय घेतील. आमची बाजू भक्कम असून आम्हाला न्याय मिळेल, असे शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Political Crisis In Maharashtra : शिवसेनेच्या घटनेवर ठाकरेंचे भवितव्य; 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांची भूमिका निर्णायक
- Maharashtra political Crisis : विधानसभा अध्यक्ष ॲक्शन मोडवर, निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना
- Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांच्या अडचणी वाढणार, शिवसेना आणणार अविश्वासाचा ठराव?